Personal Finance tips for financal decisions: महिन्याचा पहिला आठवडा हा केवळ पगार खात्यात जमा होण्याचा काळ नसतो, तर आर्थिक नियोजनाची सर्वात महत्त्वाची संधी असते. अनेक जण महिन्याच्या सुरुवातीलाच अनावश्यक खर्च करून नंतर पैशांची कमतरता जाणवू लागते. मात्र, जर पहिल्या 7 दिवसांत काही महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेतले, तर बचत वाढते, गुंतवणूक नियमित राहते आणि आर्थिक तणाव कमी होतो.
ADVERTISEMENT
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खालील सात गोष्टी करण्याची सवय लावल्यास दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळू शकते.
1. सर्वप्रथम स्वतःला पैसे द्या (Pay Yourself First)
पगार मिळाल्यानंतर सर्वात आधी बचत आणि गुंतवणुकीसाठी रक्कम बाजूला काढा.
काय केलं पाहिजे?
- SIP ऑटो-डेबिट सुरू ठेवा.
- RD किंवा बचत खात्यात ठराविक रक्कम जमा करा.
- Emergency Fund साठी वेगळी रक्कम ठेवा.
2. महिन्याचे बजेट तयार करा
संपूर्ण महिन्यातील संभाव्य खर्चाचा अंदाज पहिल्याच आठवड्यात तयार करा आणि बजेटमध्ये खालील गोष्टींचा विचार करा:
- घरखर्च
- किराणा
- EMI
- पेट्रोल
- वीज, मोबाईल, इंटरनेट
- मनोरंजन
- वैद्यकीय खर्च
यामुळे महिनाअखेरीस पैशांची कमतरता भासत नाही.
3. सर्व बिले आणि EMI वेळेवर भरा
Credit Card Bill, Home Loan, Personal Loan किंवा इतर EMI वेळेवर भरल्या तर..
- CIBIL Score चांगला राहतो.
- Late Payment Charges टळतात.
- व्याजाचा अतिरिक्त भार पडत नाही.
4. मागील महिन्याच्या खर्चाचा आढावा घ्या
फक्त कमाई वाढवणे पुरेसे नसते; खर्च कुठे झाला हे समजणे अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे काही प्रश्न हे स्वतःला विचारा.
- सर्वाधिक खर्च कुठे झाला?
- कोणता खर्च टाळता आला असता?
- Online Shopping जास्त झाली का?
- Subscription Services वापरल्या का?
5. गुंतवणुकीचे पुनरावलोकन करा
महिन्याला एकदा आपल्या गुंतवणुकीचा आढावा घेणे आवश्यक आहे.
- Mutual Fund SIP सुरू आहे का?
- शेअर बाजारातील गुंतवणूक योग्य दिशेने आहे का?
- Asset Allocation बिघडले आहे का?
- नवीन गुंतवणुकीची गरज आहे का?
6. Emergency Fund वाढवा
- अचानक येणाऱ्या खर्चासाठी Emergency Fund अत्यंत महत्त्वाचा असतो.
- दर महिन्याला थोडी रक्कम जमा करत राहिल्यास काही वर्षांत चांगला निधी तयार होऊ शकतो.
- तज्ज्ञांच्या मते, किमान 6 महिन्यांच्या खर्चाइतका Emergency Fund असावा.
7. महिन्याचे आर्थिक उद्दिष्ट निश्चित करा
महिन्याच्या सुरुवातीलाच स्वतःसाठी एक आर्थिक लक्ष्य ठरवा.
- ₹10,000 बचत करणे.
- Credit Card पूर्ण फेडणे.
- अनावश्यक Online Shopping टाळणे.
- अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत शोधणे.
- एक नवीन गुंतवणूक सुरू करणे.
आर्थिक सल्लागारांच्या मते, महिन्याच्या पहिल्या 7 दिवसांत घेतलेले निर्णय संपूर्ण महिन्याच्या आर्थिक आरोग्यावर परिणाम करतात. बचत, गुंतवणूक, बजेट आणि कर्ज व्यवस्थापन यांचा योग्य समतोल राखल्यास आर्थिक उद्दिष्टे लवकर गाठता येतात.
ADVERTISEMENT











