मुंबईची खबर: मुंबईच्या कबुतरांचा विषय थेट विधानसभेत, गुटर्गुमुळे लागलीय वाट, तरी...

कबुतरांमुळे आरोग्यावर होणार घातक परिणाम लक्षात घेऊन मंत्री उदय सामंत यांनी मुंबई महापालिकेला मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश दिले. मात्र, 'या' कबुतरखान्याच्या ठिकाणी कारवाई करण्यात आली नसल्याचं समोर आलं.

मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश...

मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश...

मुंबई तक

• 06:27 PM • 05 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश

point

मात्र 'या' कबुतरखान्यांच्या ठिकाणी कारवाई झालीच नाही...

point

कबुतरांमुळे आरोग्याला कोणता धोका?

Mumbai News: कबूतर बऱ्याच आजारांसाठी कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे घराच्या आसपास कबूतर येऊ नयेत, यासाठी बरेच उपाय केले जातात. कबूतरांच्या विष्ठेतील बुरशी तसेच जंतू आणि परजीवी माणसांमध्ये विविध आजार पसरवतात. कबुतरांमुळे आरोग्यावर होणार घातक परिणाम लक्षात घेऊन मंत्री उदय सामंत यांनी मुंबई महापालिकेला मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश दिले. 

हे वाचलं का?

मुंबईमध्ये एकूण 51 कबूतरखाने असून त्या सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, दादर पश्चिमेकडील कबूतरखाना सोडला तर इतर कोणत्याच ठिकाणी कारवाई करण्यात आली नसल्याचं समोर आलं. यासंदर्भात कौन्सिलच्या लोकप्रिय सदस्या आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांमुळे त्यांचा जवळचा नातेवाईक मृत्युमुखी पडल्याची माहिती दिली. त्यानंतर महापालिकेला एका महिन्याच्या आत कबुतरखान्यांविरुद्ध जागरूकता मोहीम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.  

कबुतरखान्यांविरुद्ध तक्रार आल्यास दंड

कबुतरखान्यांविरुद्ध तक्रार आल्यास महापालिकेकडून वॉर्डस्तरावर 500 रुपये दंड अशी कारवाई केली जाते. याबाबतीत विधानपरिषदेच्या चर्चेनंतर मुंबईतील 51 कबुतरखान्याच्या ठिकाणी कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, दादर पश्चिमेकडील कबुतरखान्या व्यतिरिक्त इतर कोणत्याच ठिकाणी ही कारवाई करण्यात आली नाही. 

लोकांनी पालन न केल्याने पुन्हा उघडण्यात...

विधानपरिषदेतील घोषणेनंतर 'जी उत्तर' वॉर्डमधील संबंधित अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी जाऊन कबुतरांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गोण्या जप्त केल्या. या कारवाईनंतर  दादरमधील प्रसिद्ध कबुतरखाना दोन दिवसांसाठी बंद होता, पण लोकांनी त्याचे पालन न केल्याने आणि कबुतरांना खायला घालत राहिल्याने ते पुन्हा उघडण्यात आले असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. 

हे ही वाचा: Pune: ना डिलिव्हरी बॉय, ना बळजबरी अन् सेल्फी सुद्धा... पुण्यातील बलात्कार प्रकरणी मोठा खुलासा

कबुतरांमुळे आजार जडतात

कबुतरांच्या विष्ठेतून आणि पंखांमधून दमा, त्वचाविकार, डोळ्यांचे आजार, सायनसायटिस, श्वासनलिकेला सूज येणे अशा बऱ्याच आरोग्याच्या समस्या उद्भवतात. कबुतरांमुळे सहआजार असलेल्या रुग्णांचा त्रास आणखी वाढतो. याबाबत मनसे पर्यावरण सेलचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांनी सांगितल्याप्रमाणे, कोणीही प्राणी-पक्ष्यांच्या विरोधात नसून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने अनधिकृत कबुतरखाने बंद करण्याची भूमिका होती. त्यानुसार विधानपरिषदेतही निर्णय घेण्यात आला. आता महापालिका वॉर्डस्तरावर याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्याला कोणी विरोध केल्यास मनसे पर्यावरण सेलचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार असल्याचं ही त्यांनी सांगितलं. 

हे ही वाचा: Raj-Uddhav Thackeray: 'जे बाळासाहेबांना, जमलं नाही.. ते फडणवीसना जमलं', राज ठाकरे असं का म्हणाले?

संघटनाच्या सदस्यांनी दिली माहिती

तसेच, जैन संघ संघटनाचे सदस्य कमलेश शाह यांनी देखील त्यांचं मत व्यक्त केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, कबुतरांमुळे आरोग्याचा कोणता प्रश्न उद्भवतो याबाबत महापालिकेकडून विविध रुग्णालयांतून अहवाल मागवला जाणार आहे. तसेच, विधानपरिषदेत दिलेले निर्देश नेमके काय आहेत याची माहिती घेतल्यानंतर त्यायालयीन लढ्याचा विचार केला जाईल. 

    follow whatsapp