Today Shocking Viral News : दुकानात 2.2 किलो..घरातील वेगवेगळ्या भागात 432 ग्रॅम आणि स्टोरेज लॉकरमध्ये 3.5 किलो...ही आहे अफूची खतरनाक कहाणी..भारतीय वंशाच्या पिता-पुत्राच्या ठिकाणांहून इतकं अफू जप्त करण्यात आलं आहे. हा सर्व माल पेस्ट आणि गोळीच्या रुपात सापडला. एवढचं नाही, तर या दोघांकडे 49 किलो अवैध तंबाखूही सापडली. यापैकी 29 किलो दुकानात आणि 20 किलो स्टोरेज लॉकरमध्ये लपवून ठेवली होती. यांच्याकडे जे अफू सापडलं, ते सामान्य अफीम नाही. त्याला कामिनी अफू असं म्हणतात. याचं थेट कनेक्शन लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी होतो.
ADVERTISEMENT
दोन्ही आरोपींची जेलमधून झाली सुटका, कारण..
ही धक्कादायक घटना ऑस्ट्रेलियात घडली. येथील भारतीय वंशाच्या पिता-पुत्राकडे अफू आणि तंबाखूच्या तस्करी प्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आलीय. दक्षिण ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या या दोन्ही पिता-पुत्रांना 26 जून 2025 ला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने मुलाला 6 महिने आणि त्याच्या वडिलांना 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. परंतु, दोन्ही आरोपींची (RRO) अंतर्गत जेलमधून सुटकाही झाली.
ऑस्ट्रेलिया बॉर्डर फोर्स (ABF) च्या तपासात उघडकीस आलं की, या दोघांनी अनेक ठिकाणी कामिनी अफू आणि तंबाखू अवैधरित्या लपवली होती. यामध्ये प्लीम्टन स्थित त्यांचे भारतीय किराणा आणि टेकअवेचं दुकानंही सामील होतं. 6.12 किलो कामिनी अफू आणि 49 किलो अवैध तंबाखू जप्त करण्यात आली. ऑस्ट्रेलियाच्या बॉर्डर फोर्सने जानेवारी 2024 मध्ये त्यांच्या दुकानावर छापा टाकला.
हे ही वाचा >> 'जय गुजरात', पुण्यात अमित शाहांसमोर एकनाथ शिंदे यांची घोषणा!
दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजमध्ये उघडकीस आलं की, आरोपी ग्राहकांना या सर्व गोष्टी विकायचा. दुकानात 2.2 किलो अफीम होतं. तर आरोपीच्या घरात 432 ग्रॅम आणि स्टोरेज लॉकरमध्ये 3.5 किलो अफू सापडलं. अशाप्रकारे एकूण 6.132 किलो कामिनी अफू जप्त करण्यात आलं. तसच दुकानातून 29 किलो आणि स्टोरेज लॉकरमध्ये 20 किलो अवैध तंबाखू सापडली.
कामिनी अफू आहे तरी काय?
कामिनी अफू एक आयुर्वेदिक औषध आहे. यामध्ये अफीम आणि अन्य पदार्थ, उदा. सिनेबार, सल्फर आणि अनेक जडी बुटी असतात. याचा वापर सामान्यत: पुरुषांच्या लैंगिक समस्या, शीघ्रपतन, स्तंभन दोष आणि लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी केला जातो.
हे ही वाचा >> पोलीस गेला ग्राहक बनून परदेशी तरूणीला बोलावलं रूममध्ये अन्... नागपूरमध्ये सुरू होतं आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट!
पित्रा-पुत्रावर काय कारवाई झाली?
ऑस्ट्रेलियाच्या बॉर्डर फोर्सने जप्त केलेल्या कामिनी अफू पॅकेटचे फोटोही शेअर केले आहेत. याप्रकरणी आरोपी मुलाल सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली. परंतु, RRO नुसार या आरोपीची सुटका करण्यात आली. पण आरोपीला 500 डॉलर्सचं बॉण्डही भरावं लागलं.
ADVERTISEMENT
