कोल्हापूर: कोल्हापुरातील करवीर पंचायत समितीमध्ये बचत गटासंबंधी माहिती घेणाऱ्या दिपा घारगे या महिलेचा पाणी पुरवठा विभागातील अनुप पाटील यांच्यासोबत वाद झाला. या दोघांतील वादाचं पर्यवसन हाणामारीपर्यंत गेलं. अखेर लक्ष्मीपूरी पोलिसांनी पंचायत समितीमध्ये धाव घेतली. तक्रार करण्यासाठी दोन्ही पक्ष पोलीस ठाण्यात दाखल झाले. मात्र, निरीक्षक कन्हेरकर यांनी दोघांची समजूत घालून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT
नेमका राडा कशामुळे झाला?
आपल्याला न्याय मिळत नसल्याच्या भावनेतून घारगे यांनी बैठकीतून उठून,थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाकडं धाव घेतली. दरम्यान, पोलीस ठाण्याबाहेर मात्र पंचायत समितीचे कर्मचारी आणि बचत गटांच्या महिलांनी मोठी गर्दी केली होती.
हे ही वाचा>> पंढरपूर हादरले, 21 वर्षीय तरुणीवर अॅसिड हल्ला, पाणीपुरी खाण्यासाठी आलेली तरुणी विव्हळू लागली अन्..
कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुक्यातील दिपा घारगे या महिला गारमेंटचा व्यवसाय करतात. बचत गटांच्या माध्यमातून त्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम करतात. आज त्या करवीर पंचायत समितीमध्ये माहिती घेण्यासाठी आल्या होत्या. प्रकाश लाड या अधिकाऱ्याकडून त्या माहिती घेत होत्या. दरम्यान पाणी पुरवठा विभागातील अनुप पाटील हे त्या ठिकाणी आले. त्यांनी प्रकाश लाड यांना काम आहे, ताबडतोब आपल्याबरोबर येण्यास सांगितलं.
त्यावेळी दिपा घारगे यांनी त्यांना रोखलं. कामाची पूर्तता झाल्यानंतर त्यांना घेऊन जा, तसंच तुम्ही कोण, तुमचं ओळखपत्र दाखवा, अशी अनुप पाटील यांना विचारणा केली. त्यातून अनुप पाटील यांनी, संबंधित महिलेवर राग काढत, तू कोण विचारणार?, अशी विचारणा केली. त्यातून दिपा घारगे आणि अनुप पाटील यांच्यात शाब्दिक वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन तिथं शिवीगाळ, धक्काबुक्की आणि कॉलरला हात घालण्यापर्यंत मजल गेली.
हे ही वाचा>> बीड : अल्पवयीन मुलीवर चुलत चुलत्याने केला बलात्कार, कोवळ्या जीवाला सहन झालं नाही, विष पिऊन आत्महत्या
वाद आणि गोंधळाचा आवाज ऐकून पंचायत समितीमधील सर्वच विभागातील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाद सोडवण्यासाठी मध्यस्थीचा प्रयत्न केला. त्यावेळी घारगे यांनी दोन महिला कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या दिपा घारगे आणि त्यांचा सहकारी प्रविण भालेकर यांनी याबाबतची लक्ष्मीपूरी पोलिसांना माहिती दिली.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घारगे आणि अनुप पाटील यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं. त्यामुळं पोलीस ठाण्याबाहेर करवीर पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचारी तसंच बचत गटाच्या महिलांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान पोलिस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी, दोन्ही तक्रारदारांना एकत्र बोलावून त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. याबाबत तक्रार दाखल करू नये, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळं संतप्त झालेल्या दिपा घारगे यांनी, बैठकीतून बाहेर पडत वरिष्ठांकडं तक्रार करण्याचा संबंधितांना इशारा दिला.
ADVERTISEMENT











