Pune: ना डिलिव्हरी बॉय, ना बळजबरी अन् सेल्फी सुद्धा... पुण्यातील बलात्कार प्रकरणी मोठा खुलासा
पुण्यातील 22 वर्षीय IT प्रोफेशनलवर झालेल्या बलात्कार प्रकरणासंबंधी नवी माहिती समोर आली आहे. पीडिता आणि हल्लेखोर काही वर्षांपासून एकमेकांना ओळखत असून ते एकाच समाजाचे असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांना दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुण्यातील बलात्कार प्रकरणी मोठी अपडेट
पीडितेने दिली खोटी माहिती?
घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं?
Pune Rape Case: पुण्यातील 22 वर्षीय IT प्रोफेशनलवर झालेल्या बलात्कार प्रकरणासंबंधी नवी माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोर पीडितेच्या ओळखीचा होता. तसेच पुरावा म्हणून वापरलेला सेल्फी महिलेने स्वतः काढला असून तो एडिट केला असल्याची माहिती तपास करणाऱ्यांनी दिली. न्यूज एजन्सी PTI ने दिलेल्या वृत्तानुसार महिलेच्या फोनवर मिळालेला धमकीचा मॅसेजही तिनेच टाइप केला होता. पीडिता आणि हल्लेखोर काही वर्षांपासून एकमेकांना ओळखत असून ते एकाच समाजाचे असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांना दिली.
महिलेने केला होता आरोप
महिलेने पोलिसांना सांगितल्याप्रमाणे बुधवारी संध्याकाळी कुरिअर डिलिव्हरी एजंट असल्याचं सांगून एक अज्ञात पुरूष कोंढवा येथील तिच्या फ्लॅटमध्ये घुसला त्याने दरवाजा बंद केला आणि केमिकल्सचा स्प्रे मानला. यानंतर पीडिता बेशुद्ध झाली आणि तिच्यावर त्या पुरुषाने बलात्कार केला. हल्लेखोराने महिलेच्या मोबाईल फोनवरून धमकीची मॅसेज आणि एक सेल्फी पाठवला असल्याचं पीडितेने सांगितलं.
पीडितेनेच सेल्फी एडिट केला...
आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची माहिती देत म्हणाले, "मूळ फोटोमध्ये त्या माणसाचा पूर्ण चेहरा स्पष्ट दिसत होता, परंतु नंतर तो एडिट करण्यात आला." तसेच आरोपी उच्च शिक्षित व्यावसायिक असल्याचं सुद्धा सांगण्यात आलं. मुलीची मानसिक स्थिती सध्या ठीक असून घटने दिवशी कोणताच रासायनिक स्प्रे वापरण्यात आला नव्हता आणि बलात्कार प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं आयुक्त कुमार यांनी सांगितलं.
पोलिसांना मिळाली माहिती
सुरूवातीला महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बँकेतून पार्सल असल्याचा दावा करत पीडितेच्या घरात घुसला आणि त्याने तिच्याकडे पेन मागितला. ती मागे वळली असता आरोपीने दरवाजा बंद केला आणि तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर ती बेशुद्ध झाली आणि तिला सुमारे 8:30 वाजता शुद्ध आल्याचा दावा तिने केला. यानंतर तिने आपल्या नातेवाईकांना फोन केला आणि पोलिसांना याची माहिती दिली.










