लालबागच्या राजाच्या दर्शन रागेत जळगावच्या तरुणाचा अंत, कुटुंबीय काय म्हणाले?

मुंबई तक

21 Sep 2026 (अपडेटेड: 21 Sep 2026, 03:36 PM)

lalbaugcha raja mumbai jalgaon jaideep nemade death : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आलेल्या जळगावच्या 25 वर्षीय जयदीप नेमाडेचा दर्शनाच्या रांगेत अचानक मृत्यू झाला. अस्वस्थ वाटल्यानंतर तो रांगेत कोसळला; पोलिस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने मदत केली.

lalbaugcha raja mumbai jalgaon jaideep nemade death

lalbaugcha raja mumbai jalgaon jaideep nemade death

Google CTA

बातम्या हायलाइट

point

लालबागच्या राजाच्या दर्शन रागेत जळगावच्या तरुणाचा अंत

point

कुटुंबीय काय म्हणाले?

lalbaugcha raja mumbai jalgaon jaideep nemade death :मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या जळगावच्या 25 वर्षीय जयदीप नेमाडे या तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. दर्शनासाठी रांगेत उभा असताना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानंतर तो जागेवरच कोसळला.

हे वाचलं का?

रांगेत उभा असतानाच अचानक अस्वस्थ वाटू लागले, काही क्षणांतच तो कोसळला

जळगाव शहरातील जीवनमोती नगर येथील रहिवासी असलेला जयदीप नेमाडे मित्रांसोबत पुण्याहून मुंबईत आला होता. गेल्या चार-पाच वर्षांपासून तो मित्रांसोबत दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत होता. यंदाही तो मित्रांसोबत दर्शनासाठी आला होता. मात्र रांगेत उभा असतानाच अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि काही क्षणांतच तो रांगेत कोसळला. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याला तेथील वैद्यकीय कक्षात नेले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वी किंवा उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

जयदीपच्या आकस्मिक मृत्यूने नेमाडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

जयदीपच्या आकस्मिक मृत्यूने नेमाडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाचा एकुलता एक मुलगा गमावल्याने कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे. जयदीप रांगेत कोसळल्यानंतर पोलिसांनी तातडीने मदत केली. लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही रुग्णालयातील व्यवस्था करण्यास मदत केली. त्यानंतर मृतदेह जळगावला आणण्यासाठी मंडळाकडून रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात आली. कुटुंबीयांनी व्यवस्थापनाकडून चांगले सहकार्य मिळाल्याचे सांगितले.

दरम्यान, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक मुंबईत येतात. मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी वैद्यकीय आणि आपत्कालीन सुविधा अधिक सक्षम करण्याची मागणी जयदीपच्या कुटुंबीयांनी केली आहे. एखाद्या भाविकाला गर्दीत अचानक अस्वस्थ वाटल्यास काही मिनिटांत वैद्यकीय मदत मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जयदीपच्या आकस्मिक मृत्यूनंतर दर्शनस्थळी वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन व्यवस्था आणि गर्दी व्यवस्थापनाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.