Maharashtra rain Update : मुंबईसह आता पालघर जिल्ह्यालाही पावसाने चांगलंच झोडपले आहे. मध्यरात्रीपासून पालघर जिल्ह्यात पावसाने रौद्ररुप धारण केलं आहे. याचा मोठा फटका हा पालघरकरांना बसला आहे. पालघरमधील आंबेदेच्या आसपासच्या क्षेत्रांमध्ये ढगफुटीसदृश्यस्थिती पावसाने थैमान घातलं आहे. या मुसळधार पावसाने आता पालघरचे जनजीवनही विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. शेतकऱ्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये पावसाचे पाणी शिरल्याने असंख्य कोंबड्या वाहून गेल्या आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबईकरांची दाणादाण, 'या' भागांमध्ये गुडघाभर पाणी, अंधेरीतील सबवे बंद, धडकी भरवणारा पाऊस
शेकडो कोंबड्या पावसाच्या पाण्यात गेल्या
आंबेदेचे निवासी निलेश पावडे पोल्ट्री फार्मवरील शेकडो कोंबड्या पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचं सांगण्यात येत आहे. या आपत्तीत कुक्कुटपालन व्यवसायिक निलेश पावडे यांचं लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पीडित शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला तात्काळ मदतीची मागणी केली आहे.
पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट
दरम्यान, आता पालघर जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे पालघरमधील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. पावसाची परिस्थिती पाहता, स्थानिक प्रशासन सतर्क राहिलेले दिसत आहे. पावसाची परिस्थिती पाहता, स्थानिक प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सु्ट्टी जाहीर केली आहे.
हे ही वाचा : काकीचा जडला पुतण्यावर जीव, काकीसोबत रोमान्स करताना काकानं पाहिलं अन् केला विरोध, नंतर विष प्राशन करत...
मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा आणि पिंजाळ या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याचं बोललं जातंय. तसेच अनेक सखल भागात पूर येण्याची शक्यता आहे. प्रशासनाने बचाव पथकाला सतर्क राहण्यास सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
