Mumbai News: मुंबईच्या सांताक्रूझ परिसरात एका तरुणीने तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्याच घरात तब्बल 18 लाखांपेक्षा अधिक रक्कम चोरली असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या प्रकरणी या किराणा व्यापाराच्या मुलीला तिच्या प्रियकरासह अटक करण्यात आली आहे. व्यावसायिकाच्या मुलीने आपल्याच प्रियकरासोबत मिळून तिच्या घरातच चोरी केल्याचं सांगितलं जात आहे. घरातील सोन्याच्या दागिन्यांसह दोघांनी मिळून तब्बल 18 लाख 60 हजार रुपयांची चोरी केली.
ADVERTISEMENT
पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांनी आरोपी निकिता धनजी हाथियानी आणि तिचा प्रियकर रविंद्र नारायण निरकर यांना अटक केली त्यांना वांद्रे कोर्टात सादर करण्यात आलं. तिथून त्यांना 10 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
स्वतःच्या घरात चोरी करण्याचा रचला कट
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी निकिताचे वडील धनजी हाथियानी हे मूळचे गुजरातमधील कच्छचे रहिवासी आहेत आणि त्यांचा गणेश ट्रेडर्स नावाने येथे मोठा किराणा व्यवसाय आहे. हाथियानी कुटुंब गेल्या 10 वर्षांपासून सांताक्रूझमध्ये राहत आहे. धनजी त्यांची पत्नी तेजी, मुलगी निकिता आणि मुलगा केतन यांच्यासोबत राहतात राहतात. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, धनजी यांची मुलगी निकिता आणि रवींद्र निरकर हे बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करायचे होते, परंतु त्यांना त्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे, निकिताने रवींद्रसोबत मिळून स्वतःच्या घरात चोरी करण्याचा कट रचला. मुलीच्या प्रेमसंबंधाबद्दल काहीच माहिती नसल्याचं पीडित कुटुंबियांनी सांगितलं.
तक्रारदार निकिताच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांच्या घरात एकूण 12 लाख रुपये रक्कम होती आणि त्यांच्या बेडरूममधील एका लोखंडी पेटीत 13 तोळे सोन्याचे दागिनेही ठेवले होते. 18 ऑक्टोबर रोजी निकिताच्या आईने त्यांना सांगितलं की, ती निकितासोबत बाजारात गेली होती आणि घरी परतल्यावर त्यांना घरातील 12 लाख रुपये रोख आणि 6 लाखांहून अधिक किंमतीचे दागिने गायब असल्याचं आढळलं.
हे ही वाचा: जोडप्याचा गाडीतील प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल, टोल प्लाझावरील कर्मचाऱ्याचं संतापजनक कृत्य! महिला आणि तरुणींना सुद्धा टार्गेट...
पोलिसांकडे केली तक्रार
बरीच शोधाशोध केल्यानंतरही घरात ठेवलेली रोख रक्कम आणि दागिने सापडले नाहीत तेव्हा पीडितांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर, अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि घटनेचा तपास सुरू झाला. तपासादरम्यान, निकितावर संशय आला, कारण तपास पथकाला निकिताचे वारंवार बदलणारे जबाब, तिचे मोबाईल रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिला भेटण्यासाठी येणाऱ्या संशयिताची माहिती मिळाली. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी निकिताची चौकशी केली. त्यावेळी, तिने सुरुवातीला दिशाभूल केली, परंतु पोलिसांनी कठोर चौकशी केली असता तिच्याच घरात तिच्या प्रियकरासोबत कट रचून चोरी केल्याचा गुन्हा कबूल केला.
हे ही वाचा: संध्याकाळी बळजबरीने खोलीत नेलं अन् शारीरिक संबंध... महिलेने दिराच्या घाणेरड्या कृत्याबद्दल सगळंच सांगितलं
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, घरात रोख रक्कम आणि दागिने असल्याची माहिती असल्याने आरोपी निकिताने चोरीची योजना आखली होती. प्रियकर रवींद्र तिच्या घरात चोरी करू शकेल म्हणून तिने तिच्या आईला मुद्दाम बाजारात नेले होते. निकिताच्या अटकेनंतर पोलिसांनी तिचा प्रियकर रवींद्र याचा माग काढला आणि त्यालाही अटक केली. दोघांनाही अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











