मुंबईत 12 वर्षाच्या मुलीची छेडछाड, अश्लील व्हिडिओ दाखवून डिलिव्हरी बॉयचा संतापजनक प्रकार

Mumbai crime : मुंबईतून एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे, ज्यात सुट्टे पैसे देण्याच्या बहाण्याने एका वर्षीय मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवले. या प्रकरणी डिलिव्हरी बॉयला मालाड पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. आरोपीने आणखी कोणत्या मुलींसोबत अश्लील कृत्य केलं याचा पोलीस सध्या तपास घेत आहेत.

Mumbai crime

Mumbai crime

मुंबई तक

• 07:11 PM • 26 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

सुट्टे पैसे देण्याच्या बहाण्याने मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवले

point

मोबाईल आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रकरण उघडकीस

Mumbai Crime : मुंबईतून एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे, ज्यात सुट्टे पैसे देण्याच्या बहाण्याने एका वर्षीय मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवले. या प्रकरणी डिलिव्हरी बॉयला मालाड पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. आरोपीने आणखी कोणत्या मुलींसोबत अश्लील कृत्य केलं याचा पोलीस सध्या तपास घेत आहेत. आरोपीच्या अशा कृत्याने परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलीस सविस्तर माहिती मिळवत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अटक केलेल्या तरुणाची ओळख मोहम्मद उपेश अनवर अंसारी (वय 24) अशी ओळख समोर आली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : आठवीच्या विद्यार्थ्यावर बाथरूममध्ये लैंगिक अत्याचार, दोन वर्गमित्र आणि 10 वीच्या मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

सुट्टे पैसे देण्याच्या बहाण्याने मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवले

पोलिसांच्या माहितीनुसार, मालाड पोलिसांनी एका महिलेला ऑनलाईन साडीची ऑर्डर दिली होती. अशातच जेव्हा डिलिव्हरी बॉय हा महिलेच्या घरी साडी घेऊन पोहोचला असता, 12 वर्षांची पीडित मुलगी घरात एकटीच होती. त्याने सांगितलं की, त्याच्याकडे सुट्टे पैसे नसल्याने माझ्यासोबत पैसे आणण्यासाठी पाठवा, मी पैसे देतो. नंतर डिलिव्हरी बॉयसोबत मुलगी गेली असता, पैसे पाठवलेले डिटेल्स दाखवण्याच्या बहाण्याने, त्याने तिला मोबाईल फोनवर अश्लील व्हिडिओ दाखवण्यास सुरुवात केली. दरम्यान, मुलगी आरडाओरड करू लागल्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. 

मोबाईल आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रकरण उघडकीस

पोलिसांच्या तपासातून माहिती समोर आली की, मोबाईल आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणानंतर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत एफआरआय नोंदवण्यात आला. दरम्यान, आरोपीने इतरत्र ठिकाणी असे हैवानी कृत्य केल्याचा तपास करत आहेत. याआधी देखील डिलिव्हरी बॉयने अश्लील कृत्य केल्याच्या अनेक बातम्या समोर आलेल्या आहेत. 

हे ही वाचा : शौचाला बसलेल्या नणंद-भावजयीवर सहा नराधमांकडून सामूहिक अत्याचार, क्रूरतेची ओलांडली परिसिमा

महिलेनं आपल्या मुलाला आणि नवऱ्याला या घटनेची माहिती दिली होती. मालाड पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे.