शौचालयास बसलेल्या नणंद-भावजयीवर सहा नराधमांकडून सामूहिक अत्याचार, क्रूरतेची ओलांडली परिसिमा

मुंबई तक

crime news :शौचालयासाठी गेलेल्या नणंद आणि भावजयीवर सहा नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संबंधित घटनेनं परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असता, पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली.

ADVERTISEMENT

crime news
crime news
google news

बातम्या हायलाइट

point

नणंद-भावजयीवर नराधमांनी ओलांडली क्रूरतेची परिसिमा

point

घटनेनं परिसर हादरून गेल्याचं चित्र

Crime News : बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील जादोपूर ठाणे क्षेत्रातील एका गावात शनिवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. शौचालयासाठी गेलेल्या नणंद आणि भावजयीवर सहा नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संबंधित घटनेनं परिसरात खळबळ उडाली. अशातच पोलिसांनी प्रकरणाची माहिती मिळवत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत, या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हे ही वाचा : डोंबिवलीत रिक्षांवर स्टिकर मोहीम, मनसेची आक्रमक भूमिका; परप्रांतीय रिक्षाचालकांना काय दिला इशारा?

शौचालयासाठी गेलेल्या नणंद-भावजयीवर नराधमांनी ओलांडली क्रूरतेची परिसिमा

घडलेल्या घटनेनुसार, घरातून शौचालयासाठी गेलेल्या नणंद-भावजयीसोबत काही नराधमांनी क्रूरतेची सिमा ओलांडली. सहा जणांनी मिळून पीडितेवर सामूहिक अत्याचार केला. या घटनेनंतर, पीडित महिला कशाबशा घरी पोहोचल्या आणि त्यांनी आपल्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली असता, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. पीडित महिलांनी एकूण सहा जणांवर सामूहिक अत्याचाराचा आरोप केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाणे परिसर हादरून गेले. 

संबंधित प्रकरणात अतिरिक्त पोलीस प्रमुख सौरभ कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तातडीने कारवाई करत नामनिर्देशात आरोपींपैकी दोघांच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, पीडितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता, पुढील कारवाईची कार्यवाही सुरु करण्यात येत आहे. या घटनेनंतर गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

हे ही वाचा : 6 वर्षांची निष्पाप चिमुरडी काका म्हणायची, शेजारच्या माणसाने गोड बोलून नेलं अन्..

दरम्यान, गावकऱ्यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलीस प्रशासनाने आश्वासन दिलं की, या प्रकरणाचा तपास निष्पक्षणपणे केला आणि दोषींना कठोर शिक्षा दिली. सध्या पोलीस, या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, प्रकरणाचा पुढील तपास करत सर्वच बाबींचा विचार करत आहेत. 
 

हे वाचलं का?