Mumbai Crime: एका अल्पवयीन पीडितेला तिच्याच आईने आणि तिच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीने या धक्कादायक प्रकरणबाबात आपल्या शाळेतील शिक्षिकेकडे खुलासा केला.
ADVERTISEMENT
शिक्षिकेने नोंदवली तक्रार
पीडितेच्या जबाबाच्या आधारे, मंगळवारी घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. ही तक्रार, पीडित मुलीच्या शाळेतील शिक्षिकेने नोंदवली. संबंधित शिक्षिकेला पीडितेने तिच्यासोबत घडलेल्या भयंकर घटनेबद्दल सांगितलं होतं. त्यानंतर, शिक्षिकेने शाळेच्या प्रशासनाला याबाबत सांगितलं आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
हे ही वाचा: ठाणे: किरकोळ कारणावरून जोडप्यात वाद... संतापलेल्या पतीने पत्नीला जागीच संपवलं, भयंकर घटनेने डोंबिवली हादरली!
आईने पैशांसाठी वेश्या व्यवसायासाठी भाग पाडलं...
या प्रकरणाबाबत पीडितेने सांगितलं की, एप्रिल 2025 तिची आई आणि तिच्यासोबत असलेला एक व्यक्ती तिला पैशासाठी सतत वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत होते. अल्पवयीन विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार, तिने या सगळ्यासाठी विरोध केल्यानंतर सुद्धा तिच्यावरील अत्याचार सुरूच राहिला. इतकेच नव्हे तर, या व्यवसायासाठी तिने नकार दिल्यानंतर तिला धमकावलं जायचं. पीडितेने तक्रारीत पुढे सांगितलं की, तिच्यावरील या अत्याचाराला कंटाळून ती एके दिवशी घरातून पळून गेली आणि तीन दिवस तिच्या मैत्रिणीच्या घरी राहिली. मात्र, भीती आणि धमक्यांमुळे ती घरी परतली. परंतु, त्यानंतर, पुन्हा तिला या व्यवसायात बळजबरीने ढकलण्यात आलं. मुलीची आई आणि तिच्यासोबत शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने पीडितेला केवळ पैशांसाठी हे सगळं करण्यास भाग पाडलं.
हे ही वाचा: नाशिक : बायकोचा बैल म्हणत आई-वडिलांकडून मानसिक छळ, लेकाची दोन मुलांसह विहिरीत उडी मारुन आत्महत्या
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
विद्यार्थीनीची ही तक्रार ऐकून शिक्षिकेला मोठा धक्का बसला. तिने लगेच शाळेच्या प्रशासनाला या पीडितेसोबत घडलेल्या वाईट घटनेबद्दल सांगितलं आणि तातडीने पोलिसांना सुद्धा याची माहिती दिली. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींविरुद्ध FIR दाखल करण्यात आला असून पीडितेची आई आणि तिच्या शेजारच्या व्यक्तीविरुद्ध गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये, पोक्सो अॅक्टसंदर्भातील कलमांचा सुद्धा समावेश आहे.
ADVERTISEMENT











