नाशिक : बायकोचा बैल म्हणत आई-वडिलांकडून मानसिक छळ, लेकाची दोन मुलांसह विहिरीत उडी मारुन आत्महत्या

मुंबई तक

Nashik Crime : नाशिक : आई-वडिलांकडून मुलाचा मानसिक छळ, लेकाची दोन मुलांसह विहिरीत उडी मारुन सामुहिक आत्महत्या

ADVERTISEMENT

Nashik Crime
Nashik Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नाशिक : आई-वडिलांकडून मानसिक छळ,

point

मुलाची दोन मुलांसह विहिरीत उडी मारुन सामुहिक आत्महत्या

Nashik Crime : चांदवड तालुक्यातील दिघवद परिसरातील रोकडोबा वस्ती येथे बुधवारी (दि. 26) सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली. पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या 35 वर्षीय दौलत उर्फ सचिन रामभाऊ हिरे यांनी त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलीसह तसेच पाच वर्षांच्या मुलाला घेऊन राहत्या घराजवळील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. सकाळी सुमारे 8.30 वाजता ही घटना घडल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळविले.

तत्परतेने मदतकार्य सुरू करत गावातील पोहण्यात निपुण तरुणांनी आणि आपत्कालीन पथकाने विहिरीत उतरून तिघांना बाहेर काढले. त्यांना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिन्ही जणांना मृत घोषित केले. या घटनेमुळे हिरे कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : ठाणे: किरकोळ कारणावरून जोडप्यात वाद... संतापलेल्या पतीने पत्नीला जागीच संपवलं, भयंकर घटनेने डोंबिवली हादरली!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौलत हिरे चांदवडच्या दिघवद ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत होते. घरगुती वाद आणि मानसिक ताणतणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त होत आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या नेतृत्वाखाली पंचनामा करण्यात आला.

हे वाचलं का?

    follow whatsapp