Mumbai Crime News : मुंबईत वडिलांनी आपल्या 20 वर्षीय मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पत्नीच्या मृत्यूनंतर आरोपीला दुसरा विवाह करायचा होता, परंतु त्याच्या दोन्ही मुलींचा या निर्णयाला कडाडून विरोध होता. यावरून कुटुंबात वारंवार वाद होऊ लागले होते. या प्रकरणात आरोप करण्यात आला की, वडिलांनीच आपल्या लेकीच्या बिर्याणीत विष मिसळून तिचा गळा दाबून संपवण्यात आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास केला आहे. ही घटना 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील वडाळा येथे घडल्याची माहिती समोर आली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : जळगाव: वारकरी शिक्षण संस्थेतील 14 वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
आरोपी वडिलांच्या दुसऱ्या विवाहाला लेकींचा विरोध
आरोपी वडिलांची शरीफ रझा हुसेन खान (वय 45) अशी ओळख पटली होती. तो व्यवसायाने सुतार असून मुंबईतील वडाळा पूर्व येथील शेख मिस्त्री दर्गा रोड परिसरातील मॅडोना कॉलनीत आपल्या तीन मुलांसोबत राहत होता. त्याच्या कुटुंबात मुलगी रिफत (20 वय), मुलगी निझात (वय 16) आणि मुलगा अहमद (वय 10) यांचा समावेश आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये त्याच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले होते. त्यानंतर शरीफला दुसरा विवाह करायचा होता, परंतु त्याच्या दोन्ही मुलींनी त्याला विरोध केला होता.
दोन्ही मुलींना टार्गेट केल्याचा तपास अधिकाऱ्यांना संशय
पोलिसांच्या माहितीनुसार, रिफतचा तिचा वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला कडाडून विरोध होता. याच मुद्द्यावरून वडील आणि मुलींमध्ये अनेकदा वाद निर्माण झाला. यामुळेच आरोपीने दोन्ही मुलींना टार्गेट केल्याचा तपास अधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला. या हत्येमागील परिस्थिती आणि आरोपीचा हेतू नेमका काय याचा तपास अजूनही सुरु आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री धाकटी मुलगी नुझात तिच्या मावशीच्या घरी गेल्यामुळे ती वाचली.
घडलेल्या घटनेनुसार, शरीफ ही 3 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घरी पोहोचले होते. त्यांनी नातेवाईकांना सांगितलं की, रिफत बेशुद्ध पडली. त्यानंतर कुटुंबियांनी तातडीने रुग्णालयात दाखल हेते, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. घटनेवेळी रिफतचे मामा अबू खान तेथे होते. त्यांना फोनवरून रिफतच्या मृत्यूची माहिती देण्यात आली होती.
कुटुंबाच्या म्हणण्यांनुसार, सुरुवातीला असे वृत्त होते की, खाल्ल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याने रिफतचा मृत्यू झाल्याची ही दुर्दैवी घटना आहे. पोलिसांच्या मते, रिफतला रुग्णालयात नेण्यात आले असता, सऱीफचे वर्तन अगदी संशयास्पद होते. डॉक्टरांना त्यांच्या मानेवर खुणा आढळून आल्या होत्या, ज्यामुळे तपास सुरु करण्यात आला आणि नंतर संशयास्पद मृत्यू झाल्याने शवविच्छेदन करण्यात आले होते.
हे ही वाचा : दुहेरी हत्याकांड! होमगार्डने पत्नी आणि मुलीची डेटा केबलनं गळा आवळून केली हत्या
एका पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, शवविच्छेदनात गळा दाबल्याच्या आणि मान आवळल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. शवविच्छेदनाच्या अहवालाच्या आधारे वडाळा पोलिसांनी शरीफ रझा हुसेन खान यांना अटक केलीय.
ADVERTISEMENT












