अडीच वर्षाच्या मुलाला दाम्पत्यांकडून चटके आणि वेताचे फटके, कारण ऐकून थक्का व्हाल

Mumbai Crime News : एका अडीच वर्षाच्या मुलाला भूत लागल्याने चटके देत वेताच्या छडीने मारहाण केल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित मुलाच्या दांम्पत्यांना अटक करण्यात आली.

mumbai crime news

mumbai crime news

मुंबई तक

28 Jun 2025 (अपडेटेड: 28 Jun 2025, 10:18 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अंद्धश्रद्धेला बळी पडून अडीच वर्षाच्या मुलाला मारहाण

point

जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Mumbai Crime News : आपण 21 व्या शतकात विज्ञानाच्या सानिध्यात वास्तव्य करतोय. आपण शालेय पाठ्यपुस्तकातही विज्ञानाचे धडे घेतलेले आहेत. वैज्ञानिकदृष्टीकोनाच्या आधारावरच हे जग सुरूये. मात्र, आजही काही लोक अंद्धश्रद्धेला बळी पडू लागलेले आहेत. अशीच एक घटना आता मुंबईतील भांडूपमध्ये घडली आहे. एका अडीच वर्षाच्या मुलाला भूत लागल्याने चटके देत वेताच्या छडीने मारहाण केल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित मुलाच्या दांम्पत्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे हे दाम्पत्य अनाथ मुलांसाठी संस्था उघडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : Maharashtra Weather: कोकणातील 'या' भागांना ऑरेंज अलर्ट, पुणे, साताऱ्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता

नेमकं प्रकरण काय? 

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षदा गुरव कोकरे आणि वैभव कोकरे असे त्या दाम्पत्यांचे नाव होते. दाम्पत्य भांडूप येथील जंगल मंगल परिसरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. बराच काळ एकत्र राहिल्यानंतर दोघांनीही आठवड्याभरातच लग्न केलं. हर्षदा ही ठाणे जिल्हा परिषदेच्या कंत्राटदार पद्धतीवर शिपाई म्हणून काम करत होती. 

पोलिसांकडून फिल्मी स्टाईलनं शोध

या प्रकरणाची माहिती पोलिसांना होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अशावेळी त्यांचं घर कुलूप बंद होतं. अशावेळी पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईलने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी फोनच्या लोकेशनवरुन दोघांचाही पत्ता शोधून काढला. भांडूपहून दोघेजण हे घनसोली येथे गेल्यानंतर त्यांची रिक्षा पार्क असल्याचे पोलिसांनी पाहिले. 

हेही वाचा : Mumbai Weather: मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, ठाणे-पालघरमध्ये कसं असेल वातावरण?

पोलिसांनी गाडीचे कागदपत्र तपासण्याचे कारण देत पेपर मागवून घेतले. त्यांनी इमारतीखाली बोलावले आणि त्याला अटक करण्यात आली. आरोपींकडून सात जादूटोणा संदर्भातील पुस्तके, नारळ तसेच अघोरी पूजेसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती आता समोर आली आहे. 

    follow whatsapp