Mumbai Crime News : मुंबईच्या पायधुनी परिसरातून मन सुन्न करून टाकणारी घटना घडली आहे. एकाने 9 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीची इस्लाम परवेझ (वय 33) अशी ओळख समोर आली. नराधम हा मॅा कॉर्पोरेट सर्व्हिसेस येथे वाचमन म्हणून कार्यरत होता. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : शनीदेवाची उलटी चाल, 'या' राशींच्या लोकांवर संकट ओढावणार
वॉचमनचा निष्पाप 9 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार
घडलेल्या घटनेनुसार, पीडित मुलगी ही खेळत होती, त्यावेळी इस्लाम परवेझ नावाच्या वॉचमनची नियत फिरली. त्याने निष्पाप 9 वर्षीय चिमुरडीला कंपनीच्या गोडाऊनमध्ये नेले, नंतर तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर परिसर हादरून गेला होता. यानंतर पीडितेला रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असल्याचे वृत्त आहे.
नागरिकांचा संताप
दरम्यान, या घटनेचा संतप्त झालेल्या नागरिकांनी तीव्र निषेध नोंदवला होता. पोलीस ठाण्याला घेराव घालत निदर्शने देखील केली होती. स्थानिकांना वॉचमनवर संशय आल्याने त्यांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले. आरोपीचा शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांची आहे.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात 'या' जिल्ह्यांत पावसाची हजेरी लागणार, हवामान विभागाची अपडेट
या घटनेनं आता चिमुरडींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चिमुरड्या मुली या देशात सुरक्षित नसतील तर त्या सार्वजनिक ठिकाणी कशा वावरतील? असा प्रश्न उपस्थित होतोय. जमावाचा आक्रोश पाहता पोलीस ठाणे परिसरात बंदोबस्त करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT












