mumbai crime : मुंबईतील नालासोपाऱ्यातील नायगावात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. नायगावात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एका 12 वर्षांच्या मुलीची सुटका करण्यात आली. ही मुलगी बांगलादेशी असल्याचं सांगण्यात येत आहे. तिच्यासोबत जे काही घडलं आहे ते अगदी भयानकच आहे. तिच्यासोबत जे काही घडलं आहे ते ऐकून अंगावर थरकापच उडेल. तीन महिन्यांत 200 हून अधिक लोकांनी तिच्यासोबत वाईट कृत्य केल्याचं त्या मुलीनेच सांगितलं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : गल्ली ते दिल्लीत राडा, 300 हून अधिक खासदार सामील, महिला रणरागिणी खासदार भिडल्या, अखिलेश यादवांनी केला कहर
त्या पीडित मुलीची 26 जुलै रोजी सुटका करण्यात आली आहे. सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मोनी फाउंडेशन एनजीओच्या सहकऱ्याने हे प्रकरण समोर आलं. मीरा भाईंदर वसई-विरार पोलिसांनी संबंधित प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक केली आहे.
हार्मोनी फाउंडेशनचे संस्थापक काय म्हणाले?
जेव्हा हार्मोनी फाउंडेशनचे संस्थापक अब्राहम मथाई म्हणाले की, मुलीची रिमांड होममध्ये चौकशी करण्यात आली तेव्हा तिने भोगलेला सर्व अनुभव सांगितला. मुलीचा अनुभव ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तिने सांगितलं की, मला गुजरातमधील नाडियाड येथे नेण्यात आले. त्या ठिकाणी तीन महिने ठेवण्यात आले. तेव्हा 200 हून अधिक लोकांनी तिच्याशी वाईट वर्तन केले होते.,
200 जणांना अटक करण्याची मागणी
अब्राहम मथाई म्हणाले की, पीडित अल्पवयीन मुलगी ही शिक्षण घेत होती. ती एका विषयात नापास झाल्यानंतर तिच्या पालकांनी तिला मारहाण केली. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीनेही आई-वडिलांच्या माराला घाबरून तिथून पळ काढला त्यानंतर ती बांगलादेशातून भारतात आली. त्यानंतर तिला काही लोकांनी मदत देतो असे आमिष दाखवून तिला वेश्यव्यवसायात ढकलले. मुलीशी वाईट वर्तन करणाऱ्या 200 जणांना अटक करण्यात यावी अशी मथाई यांनी पोलिसांकडे मागणी केली आहे.
हे ही वाचा : गँग ऑफ वासेपूर स्टाईलने हुमा कुरेशीच्या भावाचा खून, 'त्या' धारदार शस्त्राने केला हल्ला, मांस विक्रीचंही प्रकरण
संबंधित प्रकरणात पोलीस आयुक्त निकेत कौशिक म्हणाले की, पोलीस संपूर्ण नेटवर्कची चौकशी करत आहेत. त्याचबरोबर असुरक्षित मुलांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे कामही केले जात आहे.
ADVERTISEMENT
