Mumbai monsoon : महाराष्ट्रासह मुंबईला मुसळधार पावसाने झोडपलं आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने रौद्ररूप धारण केलं आहे. 19 ऑगस्ट रोजी स्थानिक प्रशासनाने मुंबईतील शाळा आणि विद्यालयांना सुट्टी जाहीर केली. अशातच आता मुंबईसह उपनगरातील रस्यांना नाल्याचं स्वरूप आले आहे. यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र आहे. याच पावसामुळे मिठी नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. पवईतील फिल्टर पाड्यातील याच मिठी नदीतून एक तरुण वाहून गेल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पालघरमध्ये ढगफुटी सदृश्यस्थिती, पोल्ट्री फार्ममधून असंख्य कोंबड्या गेल्या वाहून, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
व्हिडिओत नेमकं काय?
व्हिडिओमध्ये तरुण मिठी नदीत अडकून पडल्याचं दिसून येत आहे. त्याला वाचवण्यासाठी घटनास्थळी असलेल्या उपस्थितांना प्रयत्न केला असता, प्रयत्न असफल ठरला. तरुणाने नदीच्या एका कोपऱ्यावर जाऊन स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. एका व्यक्तीने तरुणाचा जीव वाचवण्यासाठी आधार म्हणून पाईप दिला. पण तरुणाला पाण्याच्या वाहत्या प्रवाहासमोर पाईप पकडता आला नसल्याने तरुण वाहत्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.
कुर्ल्यातील क्रांतीसूर्य भागातील नागरिकांना हलवण्यात आलं
दरम्यान, मिठी नदीच्या पाण्याच्या पातळीत 3.9 मिमी इतकी वाढ झाली आहे. ही परिस्थिती पाहता कुर्ल्यातील क्रांतीसूर्य भागातील नागरिकांना महापालिकेच्या मगनदास नथुराम शाळेत हलवण्यात आले आहे. बृहन्मुंबई महापालिकेनं नागरिकांच्या खानपानाची व्यवस्था केल्याचं सांगण्यात येत आहे. मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असली तरीही आता नदीची पातळी ओसरू लागल्याचं दिसून येतंय. 3.9 मिमी वरुन मिठी नदीची पातळी आता 3.6 इतकी झाली असल्याचं वृत्तमाध्यमं सांगत आहेत.
हे ही वाचा : वासनेनं भरली होती महिला, नवऱ्याला सोडून जावयासह भाऊजीशी ठेवले प्रेमसंबंध, पतीला कांड समजताच..
दरम्यान, मुंबईत सलग चार दिवस पावसाने रौद्ररुप धारण केलं आहे. मुंबईसह पालघरमध्येही मध्यरात्रीपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. रस्त्यांना नाल्याचं स्वरुप आल्याचं चित्र समोर आलं आहे. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचं सांगण्यात येत आहे.
मिठी नदीतून तरुण गेला वाहून, धडकी भरवणारा व्हिडिओ
ADVERTISEMENT
