Mumbai News: अतिशय गर्दीच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. डिसेंबर महिन्यापासून प्रवाशांच्या सेवेसाठी नॉन-एसी क्लोज डोअर म्हणजेच दरवाजा बंद लोकल ट्रेन उपलब्ध होणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. सोमवारी (4 ऑगस्ट) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ सतीश कुमार यांनी ही याबाबतची माहिती दिली. या बैठकीत त्यांनी रेल्वेच्या पायाभूत सुविधेअंतर्गत प्रोजेक्टच्या प्रगतीचा आणि नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला.
ADVERTISEMENT
महत्त्वाच्या बैठकीत निर्णय
या महत्त्वाच्या बैठकीत त्यांनी उत्तम प्रवासी सुविधा, सुरक्षा आणि विकास कामे जलद गतीने पूर्ण करण्यावर भर दिला. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC), रेल्वे जमीन विकास प्राधिकरण (RLDA) यासह अनेक एजन्सींचे उच्च अधिकारी यावेळी उपस्थित होते.
हे ही वाचा: कपलचा रोमान्स सुरु होता पण मागून दोन मुलं... तरुणीवर सामूहिक अत्याचार अन् प्रियकर गेला पळून
रेल्वे लाइनच्या कामाचा आढावा
सतीश कुमार यांनी MMR मधील लोकल ट्रेन सेवा वाढवण्यासाठी महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सचा आढावा घेतला. यामध्ये अधिकाऱ्यांनी मुंबई सेंट्रल-बोरिवली दरम्यानच्या 5 व्या आणि 6 व्या लाइनच्या कामाची, विरार-डहाणू विभागाच्या चौथ्या लाइनच्या विस्ताराची, कल्याण-कसारा, कल्याण-बदलापूर विभागातील नवीन ट्रॅकची आणि कुर्ला-परळ दरम्यान सुरू असलेल्या 5 व्या आणि 6 व्या लाइनच्या प्रोजेक्टची सविस्तर माहिती दिली.
हे ही वाचा: अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचं मुंडकंच छाटलं अन्... नंतर न्यूज चॅनलला सांगितली भलतीच गोष्ट
17 उपनगरीय स्टेशनकांचे काम प्रगतीपथावर...
17 उपनगरीय स्टेशन्सच्या सुधारणांचे काम प्रगतीपथावर असल्याची एमआरव्हीसी अधिकाऱ्यांनी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांना माहिती दिली. तसेच, सीएसएमटीच्या पुनर्विकास कामाचाही आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी पुनर्विकास कामाचीही पाहणी केली. सीएसएमटी स्थानकाचे काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचे सांगण्यात आले. विकसित भारत 2047 च्या लक्ष्यात रेल्वेच्या योगदानावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
ADVERTISEMENT
