साड्या नेसलेल्या 2 परदेशी तरुणी ताजमहल पाहत होत्या..अचानक असं काही घडलं..महिला पोलिसाने धाव घेतली अन्..

Tourist At Taj Mahal Viral Video : इटलीच्या दोन तरुणी उत्तर प्रदेशच्या आगरा येथील ताजमहल पाहण्यासाठी आल्या होत्या. रंगीबेरंगी साडी परिधान करून त्या पर्यटनाचा आनंद लुटत  होत्या.

Tourist At Taj Mahal Viral Video

Tourist At Taj Mahal Viral Video

मुंबई तक

• 08:41 PM • 04 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

इटलीच्या दोन तरुणी ताजमहल पाहण्यासाठी भारतात आल्या अन्..

point

साडी नेसायला महिला पोलिसाने केली मदत

point

परदेशी महिलांचा व्हिडीओ तुफान व्हायरल

Tourist At Taj Mahal Viral Video : इटलीच्या दोन तरुणी उत्तर प्रदेशच्या आगरा येथील ताजमहल पाहण्यासाठी आल्या होत्या. रंगीबेरंगी साडी परिधान करून त्या पर्यटनाचा आनंद लुटत  होत्या. पण अचानक त्यांची साडी खुली झाली. त्यानंतर त्या पुन्हा साडी नेसण्याचा प्रयत्न करत होत्या.

हे वाचलं का?

पण त्याचदरम्यान ताजमहल सुरक्षा दलातील महिला पोलीस अधिकारी आरक्षी लक्ष्मी देवीनं त्या महिलांना साडी नेसून देण्यास मदत केली. या महिला पोलीस अधिकाऱ्याचं सर्वत्र कौतुक होत असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
भारत फिरायला आलेले इटलीचे 15 टूरिस्ट ताजमहलचं कौतुक करत होते.

हे ही वाचा >> IND vs ENG, 5th Test: Test मॅच नाही जणू टी-20, मोहम्मद सिराजने 'असा' बदलला गेम अन् रचला इतिहास!

साडीला घड्या कशा करतात, ते सुद्धा परदेशी महिलांना शिकवलं..

याचदरम्यान एलिसिया आणि ब्रूना नावाच्या महिलेनं साडी नेसली होती. पण एका गेटवर या महिलांची साडी खुली झाली आणि त्या महिलांनी साडी सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना साडी व्यवस्थितरित्या बांधता येत नव्हती. अशातच ताजमहलची महिला सुरक्षा अधिकारी लक्ष्मी देवीनं त्यांना मदत केली. इतकच नव्हे तर त्यांना साडीला घड्या कशा करतात, ते ही परदेशी महिलांना शिकवलं. 

याचदरम्यान, एलिसियाने लक्ष्मी देवीला विचारलं, तुम्हीही साडी नेसता का? तेव्हा त्या म्हणाल्या ड्युटीनंतर मी साडी नेसते आणि कधी कधी पोलिसांची वर्दीतील साडीही नेसावी लागते. त्यांनी एलिसिया आणि ब्रूनाला साडी नेसण्याची पारंपारिक पद्धतही सांगितली. यानंतर एलिसिया आणि ब्रूनाने लक्ष्मीचा हात धरून तिचे आभार मानले. एलिसियाने म्हटलं की, मला साडी नेसणं खूप आवडलं. ड्रेस खूप छान आणि कंम्फरटेबल आहे. एलिसियाने म्हटलं की, तिने नीळ्या आणि गुलाबी प्रिंटची साडी नेसली होती. 

हे ही वाचा >> धावत्या लोकलमधून चोरट्याने मोबाईल हिसकावला, प्रवाशाचा गेला तोल अन् पाय चिरडले, नेमकं ठाण्यात काय घडलं?

    follow whatsapp