"जा मराठी बोलणार नाही हा हिंदुस्तान...", परप्रांतिय महिला दुकानदाराची मराठी ग्राहकांवर मुजोरी

Marathi-Hindi : मुंबईतील घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी हिंदी वाद उफळला. हा हिंदूस्तान आहे इथं हिंदी बोला म्हणत परप्रांतिय महिला दुकानदार भांडू लागली.

marathi-hindi controversy

marathi-hindi controversy

मुंबई तक

• 10:22 AM • 21 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

हिंदी विरुद्ध मराठी वाद पुन्हा उफळला

point

मीरा भाईंदरनंतर आता घाटकोपरमध्ये मराठीचा वाद समोर

Marathi-Hindi : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदी विरुद्ध मराठी वादाने तोंड वर काढले आहे. काही दिवसांपूर्वी हिंदी विरुद्ध मराठी हा वाद मीरा बाईंदर येथे दिसून आला. यानंतर राज्यातील मराठी अमराठी हा मुद्दा देशपातळीवर गाजत आहे. यामुळं आता सारं रान पेटलेलं दिसून येत आहे. त्यानंतर आता हाच हिंदी आणि मराठी वाद हा घाटकोपरमध्ये दिसून आला आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : आता काय खंर नाय! मुंबईत पाऊस पुन्हा घालणार धुमाकूळ..या भागात धो धो बरसणार, जाणून घ्या आजचं हवामान

घाटकोपरमध्ये पुन्हा हिंदी मराठी वाद

घाटकोपरमध्ये एका परप्रांतिय महिलेनं मराठी बोलण्यास नकार दिला. ती महिला एवढ्यावरच न थांबता मराठी माणसांना तुम्हीच हिंदी बोला असं म्हणत तिनं जबरदस्ती केली. तिचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

घाटकोपर येथील पूर्वभागात मदन केटरर्सच्या बाजूला एका दुकानाबाहेर काही लोक उभे होते. या दुकानातील दुकानदार महिला ही मूळ बिहारची असल्याची माहिती समोर आली. याच महिलेनं मराठी ग्राहकांना हटकलं. मराठीत बोला असं ग्राहकांनी सांगितलं असता, तिनं नकार दिला आणि त्यातूनच हा वाद उफळला आहे. 

"आम्ही हिंदुस्तानात राहतोय, हिंदीमध्ये बोला..."

आम्ही हिंदुस्तानात राहतोय, हिंदीमध्ये बोला असं म्हणत ती महिला भांडताना दिसते. मराठी नाही,तर हिंदीतच बोला असं म्हणत महिला दम देताना दिसत आहे. या घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हेही वाचा : मंगळ ग्रह दीड वर्षानंतर राशी बदलणार, 'या' राशीतील लोक मालामाल होणार, तुमची कोणती राशी?

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेकजण याला राजकीय दृष्टीकोणातून पाहत आहेत. हाच मुद्दा काल परवा मुंबई लोकल ट्रेनमध्ये दिसून आला होता. मुंबई लोकल ट्रेनमध्येही काही महिला या मराठी बोलण्यास सांगत असल्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. त्या व्हिडिओनंतर आता हे प्रकरण समोर आलं आहे.   

    follow whatsapp