मुंबईची खबर: आता, मुंबईत पुन्हा मोनोरल धावणार! MMRDA चा मोठा निर्णय... कधीपासून होणार सुरू?

आता मुंबईकरांसाठी एक दिलासाजनक बातमी समोर आली आहे. शुक्रवारी एमएमआरडीने आपल्या ऑफिशिअल एक्स अकाउंटवर मुंबईत मोनोरेल पुन्हा चालणार असल्याची घोषणा केली.

मुंबईत पुन्हा मोनोरल धावणार!

मुंबईत पुन्हा मोनोरल धावणार!

मुंबई तक

• 04:48 PM • 22 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

आता, मुंबईत पुन्हा मोनोरल धावणार!

point

MMRDA चा मोठा निर्णय... कधीपासून होणार सुरू?

Mumbai News: मुंबईत मोनोरेल सुरू झाल्यानंतर ती तोट्यात होती. 20 सप्टेंबर 2025 रोजी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मोनोरेल सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मागील आठ वर्षांत एमएमआरडीएने वारंवार येणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे मोनोरेल सेवा तात्पुरती स्थगित करण्याची ही तिसरी वेळ होती. आता मुंबईकरांसाठी एक दिलासाजनक बातमी समोर आली आहे. शुक्रवारी एमएमआरडीने आपल्या ऑफिशिअल एक्स अकाउंटवर मुंबईत मोनोरेल पुन्हा चालणार असल्याची घोषणा केली. 

हे वाचलं का?

तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल बंद... 

2025 मध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाच्या कारणामुळे मोनोरेल सर्व्हिस तीन वेळा स्थागित करण्यात आली होती. 15 सप्टेंबर रोजी, मुसळधार पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने मोनोरेल अचानक बंद पडली. दरम्यान, 19 ऑगस्ट रोजी, गर्दीच्या कारणामुळे मोनोरेल अचानक बंद पडली आणि त्यावेळी 500 हून अधिक प्रवासी अडकून राहिले. अशाप्रकारे, वेगवेगळ्या कारणांमुळे मोनोरेलच्या प्रवाशांची गैरसोय होत राहिली. 

मोनेरेल सर्व्हिस पुन्हा सुरू करण्यात येणार

पण आता मुंबईकरांची प्रतीक्षा संपली आहे आणि मोनोरेलला ब्युरो व्हेरिटासकडून त्यांच्या नवीन रोलिंग स्टॉक आणि CBTC-आधारित सिग्नलिंग सिस्टमसाठी आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्र मिळालं आहे. ब्युरो व्हेरिटास ही एक स्वतंत्र सेफ्टी असेसरची भूमिका साकारणारी संस्था आहे. यासोबतच, एमएमआरडीएने माहिती दिली की, मुंबईत लवकरच मोनेरेल सर्व्हिस पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. 

हे ही वाचा: पंढरपूर : सासूला मारण्यासाठी सुनेनं पाण्यात मिसळलं विष, पण नवऱ्याचाच गेला बळी... कसा फसला महिलेचा डाव?

MMRDA च्या माहितीनुसार, ही नवी मोनोरेल पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित, स्मार्ट आणि वेगवान आहे. या नव्या रेकला मंजूरी मिळाली असून आता संपूर्ण कॉरिडोरच्या सेफ्टी टेस्टची प्रतिक्षा आहे. या 19.54 किमी लांब मोनोरेल कॉरिडोरच्या निरीक्षणासाठी फायनल मेडिकल क्लीअरंस घेण्यासाठी एका रिटायर्ड मेट्रो रेल सेफ्टी कमिश्नरची नियुक्ती केली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच नवी मोनोरेल पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत येईल. 

हे ही वाचा: Govt Job: कोणत्याही परीक्षेशिवाय भारत सरकारच्या कंपनीत नोकरी... 'या' उमेदवारांसाठी तर सुवर्णसंधी

या नव्या मोनोरेल रेकमध्ये एकूण 21 सुधारणा करण्यात आल्या असून प्रत्येक मोनोरेलमध्ये CCTV कॅमेरे, अपंगांसाठी वेगळी बसण्याची व्यवस्था, मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंग पॉइंट, डायनॅमिक रूट मॅप, आरामदायी प्रवासासाठी सुधारित सस्पेंशन, अग्निसुरक्षा मानकांचे काटेकोरपणे पालन करणारी रचना, आधुनिक मेट्रो-शैलीतील इंटीरिअर डेकोरेशन आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग तसेच सर्व्हिलांस सिस्टिम अशा सुविधा असतील. 

    follow whatsapp