मुंबईची खबर: मुंबई सेंट्रलला जोडणाऱ्या 'या' ब्रिजचं काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार

मुंबई तक

06 Feb 2026 (अपडेटेड: 06 Feb 2026, 05:34 PM)

मुंबई सेंट्रलमध्ये बांधला जाणारा बेलासिस उड्डाणपुल लवकरच मुंबईकरांसाठी खुला होणार असल्याची माहिती आहे. बीएमसीने या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण केलं आहे.

Mumbai Tak

(AI Photo)

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबई सेंट्रलला जोडणाऱ्या बेलासिस ब्रिजचं काम पूर्ण

point

लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार

Mumbai News: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पायाभूत सुविधांचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. मुंबई सेंट्रलमध्ये बांधला जाणारा बेलासिस उड्डाणपुल लवकरच मुंबईकरांसाठी खुला होणार असल्याची माहिती आहे. बीएमसीने या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण केलं  आहे. महापौर पदांच्या निवडणुका संपल्यानंतर या उड्डाणपुलावरून वाहने धावण्यास सुरुवात होईल. दक्षिण मुंबईतील जहांगीर बोमन बेहराम रोड (पूर्वी बेलासिस रोड) वरील बेलासिस पूल हा मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेवच्या पूर्व-पश्चिम भागांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. 

हे वाचलं का?

बीएमसीला आता केवळ वाहतूक पोलिसांकडून एनओसी मिळवावी लागेल. बीएमसीने उड्डाणपुलावर ध्वनी प्रतिबंधक यंत्रणा देखील बसवली असून हा उड्डाणपुल 15 फेब्रुवारीपर्यंत उघडण्याची अपेक्षा आहे. बीएमसीचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी स्वतः पूल प्रकल्प स्थळाला भेट दिली आणि प्रोजेक्टची पाहणी केली. ताडदेव-नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकांना जोडणाऱ्या बेलासिस उड्डाणपुलाचे अंतिम काम अवघ्या 15 महिन्यांत पूर्ण झालं आहे. या पुलाचं बांधकाम पूर्ण करण्याची डेडलाइन एप्रिल 2026 होती. अशातच, चार महिन्यांपूर्वी या ब्रिजची निर्मिती करण्यात आली. 

हे ही वाचा: "जिल्हाधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे जव्हारच्या 200 बेड रुग्णालयाचा निधी HUDCO कडे परत जाण्याची नामुष्की!"

या प्रोजेक्टसाठी मुंबई महापालिकेला पूल विभाग, रेल्वे ऑथरिटी, संबंधित वॉर्ड कार्यालये आणि वाहतूक पोलीस यांच्यात सतत समन्वय ठेवून काम करावं लागेल. बेलासिस पुलाच्या पुनर्बांधणीमुळे दोन वर्षांपासून प्रभावित झालेली पूर्व-पश्चिम वाहतूक पूर्ववत होणार आहे. हा पूल खुला झाल्यानंतर, जहांगीर बोमन बेहरम रोड, दादासाहेब भडकमकर रोड (ग्रँट रोड), खासकर पठ्ठे बापूराव रोड आणि महालक्ष्मी स्तनाक पुलावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. 

बीएमसीच्या मते, फिनिशिंगचं काम 6 जानेवारी 2026 रोजी पूर्ण झालं होतं. पुलाला लोड टेस्ट क्लिअरन्स, तसेच स्ट्रक्चरल स्थिरता आणि सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. रेल्वे विभाग आणि वाहतूक पोलिसांनी हिरवा कंदील दिल्यानंतर हा पूल खुला केला जाईल.