नवी मुंबई: मनसेचा दणका, सलून मालकाने महिलेला पगार दिला नाही; मनसैनिकांची एंट्री झाली अन्...

Navi Mumbai : नवी मुंबईतील कामोठे परिसरात एका सलूनच्या दुकानात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. महिला कर्मचाऱ्याने मनसेच्या कार्यकर्त्यांकडे अनेक महिन्यांच्या कामाचा पगार न दिल्याची तक्रार दाखल केली. याचच प्रत्युत्तर म्हणून मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी सलूनच्या मालकाला चांगलाच चोप दिला.

navi mumbai

navi mumbai

मुंबई तक

• 07:00 AM • 20 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलेला सलून मालकाने पगार दिला नाही

point

थेट मनसेंच्या कार्यकर्त्यांकडे केली तक्रार

point

सलूनमध्ये पुढं काय घडलं?

Navi Mumbai : नवी मुंबईतील कामोठे परिसरात एका सलूनच्या दुकानात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. महिला कर्मचाऱ्याने मनसेच्या कार्यकर्त्यांकडे अनेक महिन्यांच्या कामाचा पगार न दिल्याची तक्रार दाखल केली. याचच प्रत्युत्तर म्हणून मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी सलूनच्या मालकाला चांगलाच चोप दिला. ही घटना 17 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी घडली होती. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नंदूरबार: देवीच्या यात्रेवरून येणारी पिकअप उलटली तब्बल 6 भाविकांचा गेला जीव अन्...

महिलेची सलून मालकाकडे वेतनाची मागणी

एका वृत्तमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, महिला कर्मचारी अनेक महिन्यांपासून आपला रखडलेल्या वेतनाची संबंधित सलून मालकाकडे मागणी करत होती. तिने अनेकदा पैसे मागितले तेव्हा मालकाने तिच्याशी गैरवर्तन केले असा महिलेचा आरोप आहे. त्यानंतर संतापलेल्या महिलेनं मनसे कार्यकर्त्यांना फोन केला. त्यानंतर मनसेनं म्हटलं की, त्यांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण जे घडले ते कायदा हातात घेण्यासारखेच होते. 

संबंधित घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मनसेच्या एका कार्यकर्त्याने रेकॉर्ड केल्याचं सांगण्यात येत आहे. एका वृत्तमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात कामोठे पोलिसांनी सांगितलं की, अद्यापही पक्षाकडून या प्रकरणाची कसलीही तक्रार दाखल केली गेली नाही. 

हे ही वाचा : फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने ओळखीचा गैरफायदा घेतला, नंतर मुलीच्या घरी येणं जाणं सुरु केलं अन्... रत्नागिरी हादरलं!

या प्रकरणाचा संपूर्ण व्हिडिओचा तपास करून सतत्या पडताळण्याचे काम करत आहेत. दरम्यान, मुंबईसह राज्यात परप्रांतियांनी केलेल्या मुजोरीचे व्हिडिओही नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानंतर ही नवी मुंबईतील कामोठे येथील घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. याच नवी मुंबईतील पनवेलमध्ये देखील मनसेनं काही महिन्यांपूर्वी अवैध बार फोडत निषेध व्यक्त केला होता. 

    follow whatsapp