Mumbai News: आजच्या काळात दर दिवसाला मुलीवर अत्याचार झाल्याची बातमी समोर येत असते. मुंबईमध्ये सुद्धा मुलींवर बलात्काराच्या घटानांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. अगदी अल्पवयीन मुलींवर सुद्धा लैंगिक अत्याचार किंवा विनयभंग होत असल्याचं समोर येत असतं. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत मंगळवारी (10 जून) या एकाच दिवशी बलात्कार आणि विनयभंग झाल्याच्या 4 तक्रारी मुंबई पोलिसांकडून दाखल करण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT
अल्पवयीन मुलगी गर्भवती
मुलुंडमध्ये एका मोठ्या आणि नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली. यावेळी एका 16 वर्षीय मुलीवर तिच्या 17 वर्षीय मित्राने बलात्कार केला. यानंतर मुलीला अस्वस्थ वाटल्यानंतर ती ठाण्यामध्ये एका रुग्णालयात तपासणीसाठी गेल्यावर हा सगळा प्रकार समोर आला. यासंबंधी मुलीच्या 17 वर्षीय मित्रावर नवघर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याला डोंगरीमधील बालसुधारगृहात पाठवण्यात आले.
डॉक्टराकडून तरुणीचा विनयभंग
मुंबईतील गोवंडीमध्ये एका डॉक्टराकडून तरुणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी उपचारासाठी एक 16 वर्षीय तरुणी दवाखान्यात गेली होती. तपासणी करत असताना त्याने तरुणीचा विनयभंग केला.
हे ही वाचा: Air India Plane Crash Video: एअर इंडियाचं विमान असं कोसळलं, थरकाप उडवणारा 'तो' व्हिडिओ आला समोर!
लहान मुलीचा विनयभंग
मालाड पूर्व भागात एका अल्पवयीन मुलीवर विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी मैदानात खेळत असलेल्या एका 11 वर्षीय मुलीचा एका व्यक्तीकडून विनयभंग करण्यात आला. सकाळी 11 वाजताच्या सुमारास एक लहान मुलगी मैदानात खेळत असताना एक व्यक्ती तिथे गेली आणि तिचा विनयभंग केला. ती व्यक्ती तिथून नंतर पळून गेली आणि कुरार पोलिसांकडून यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा: Sangli Crime: वटपौर्णिमेच्या दिवशीच नवऱ्याचा घेतला जीव, पत्नीने लग्नाच्या 15 दिवसातच थेट कुऱ्हाडीनेच...
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
अंबोलीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर वर्षभरापासून लैंगिक अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तिच्या शेजारी राहणाऱ्या दोन मुलांकडून तिच्यावर अत्याचार करण्यात. मुलीच्या घरी कोणी नसताना ती मुले तिच्या घरी जाऊन तिचा लैंगिक छळ करत होती. तिला अश्लील फिल्म्स दाखवून तिच्यासोबत असं घाणेरडं कृत्य करण्यात आलं. कोणालाही हा प्रकार सांगू नये म्हणून त्या मुलीला ती मुलं सतत धमकावत होती. या धक्कादायक प्रकाराबाबत अंबोली पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
