Air India Plane Crash Video: एअर इंडियाचं विमान असं कोसळलं, थरकाप उडवणारा 'तो' व्हिडिओ आला समोर!

मुंबई तक

12 Jun 2025 (अपडेटेड: 12 Jun 2025, 03:01 PM)

विमानतळापासून मेघानीनगरचे अंतर सुमारे 15 किलोमीटर आहे. अपघातानंतर लगेचंच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली.

एअर इंडिया विमान अपघाताचा व्हिडिओ आला समोर

एअर इंडिया विमान अपघाताचा व्हिडिओ आला समोर

Google CTA

बातम्या हायलाइट

point

अहमदाबादमध्ये विमान क्रॅश, मोठी दुर्घटना

point

टेक ऑफ करतानाच विमान कोसळलं

point

रहिवासी भागात विमान कोसळल्याची माहिती

Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघात झाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. याबद्दलचे काही  व्हिडीओ अपघातस्थळावरून समोर आलेले आहेत. या व्हिडीओमध्ये आकाशातून काळा धूर उडताना दिसत होता. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. अहमदाबाद विमानतळावरून विमानाने उड्डाण केल्यानंतर लगेचच हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. पण हे विमान नेमकं कसं कोसळलं याचा व्हिडिओच आता समोर आला आहे.

हे वाचलं का?

एअर इंडिया विमान अपघाताचा Exclusive व्हिडिओ

हे ही वाचा >> फडणवीस-ठाकरेंची 'राज' भेट, दुसरीकडे मनसे नेते उदय सामंतांना भेटले, घडामोडींचा अर्थ काय?

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच मेघानीनगरजवळ अपघात झाला. विमानतळापासून मेघानीनगरचे अंतर सुमारे 15 किलोमीटर आहे. अपघातानंतर लगेचंच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा >> Sangli Crime: वटपौर्णिमेच्या दिवशीच नवऱ्याचा घेतला जीव, पत्नीने लग्नाच्या 15 दिवसातच थेट कुऱ्हाडीनेच...

अहमदाबादमध्ये काही रुग्णालयांमधील व्हिडीओ सुद्धा समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये रुग्णालयांमध्ये रुग्णांना वाचवण्यासाठीची धावपळ सुरू झाल्याचं दिसतंय. 

नेमकं काय घडलं?

प्राथमिक माहितीनुसार, जेव्हा या विमानाला अपघात झाला तेव्हा त्या विमानात क्रू मेंम्बर्ससह एकूण 242 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

एअर इंडियाच्या या विमानाने (AI-171) दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (IGI विमानतळ) अहमदाबादसाठी उड्डाण केले होते. ज्यानंतर येथे काही वेळ थांबल्यानंतर गुरुवारी (12 जून) दुपारी  लंडनसाठी उड्डाण केलेलं असताना हाँ अपघात झाला.