छत्रपती संभाजीनगर : बुधवारी संध्याकाळी छत्रपती संभाजीनगरातील सिद्धार्थ गार्डनमध्ये एक दुर्घटना घडली. प्रवेशद्वारावराचा भाग कोसळल्यानं ही घटना घडली. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. जोरदार वारं आणि पावसामुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जातंय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> विजांचा कडकडाट..वादळी वारे अन् मुसळधार पाऊस! मुंबई-ठाण्यात 'या' भागात बरसणार? कसं आहे आजचं हवामान?
सिद्धार्थ गार्डनमधील या दुर्घटनेत स्वाती अमोल खैरनार आणि रेखा हरिभाऊ गायकवाड यांचा मृत्यू झाला आहे. तसंच शेख अखिल आणि एक गंभीर जखमी आहेत. काही लहान मुलंही या दुर्घटनेत जखमी आहेत.
मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत
पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी माध्यमांना सांगितलं की, "सिद्धार्थ गार्डन घटनेबाबत महापालिकेकडून लेखी तक्रार मिळाल्यानंतर आम्ही एफआयआर दाखल करून संबंधितांवर कारवाई करू." मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
कमकुवत इमारतींची तपासणी करणार
हे ही वाचा >> सोनम बेवफा! राजाचा मृतदेह खोल दरीत कोणी फेकला? सर्वात मोठा खुलासा, सोनम अन् किलर्सने...
महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितलं, "सिद्धार्थ गार्डनच्या प्रवेशद्वारावरील कमान कोसळल्यानं दोन जणांचा मृत्यू झाला. तसंच या घटनेत दोन जण जखमी झालं. जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आम्ही FIR दाखल करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये मदत दिली जाईल. याशिवाय, इतर सर्व कमकुवत इमारतींचीही विशेष तपासणी केली जाईल. 7 दिवसांत ऑडिट पूर्ण करून गार्डनमध्ये प्रवेशाची परवानगी द्यायची की नाही, हे ठरवलं जाईल."
झाड कोसळल्यानं महिला जखमी
दरम्यान, भगतसिंह नगर परिसरात जोरदार वाऱ्यामुळे एक झाड कोसळल्यानं एक महिला गंभीर जखमी झाली. याबाबत नगर आयुक्त म्हणाले, "भगतसिंह नगरात झाड कोसळल्यानं एक महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत."
ADVERTISEMENT
