Haryana News: हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या पत्नीचे शेजाऱ्याशी अवैध संबंध असल्याच्या संशयावरून तिची हत्या केली. यानंतर आरोपीने स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. सुरुवातीला सगळं काही ठीक होतं असं म्हटलं जात आहे, पण गेल्या 10 ते 12 वर्षांपासून वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
ही घटना सिरसा जिल्ह्यातील मीरपूर कॉलनीमध्ये घडल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीचे नाव माखन सिंग असून तो मूळचा सिरसा येथील हंजिरा गावचा रहिवासी आहे. माखनचा 2004 मध्ये आरतीशी विवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. माखन कष्टाची मजुरी करून घर चालवत होता.
नेमकं काय घडलं?
खरंतर, माखन सिंगची पत्नी आरती हिचे शेजारी राहणाऱ्या लाखी सिंगशी अवैध संबंध असल्याचा असा आरोप आहे. लाखीच्या पत्नीला हे कळले आणि तिला या सगळ्यामुळे धक्काच बसला. दरम्यान, 7 जून रोजी आरती लाखीला भेटायला गेली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लाखीची पत्नी पोलिसांसह माखनच्या घरी पोहोचली. लाखीच्या पत्नीने माखनला 'आरतीला समजावून सांगून तिला पटवून द्या', असं सांगितलं.
हातोड्याने केले वार
लाखीची पत्नी गेल्यानंतर, या प्रकरणावरून माखन आणि आरतीमध्ये मोठं भांडण झाले. दरम्यान, 9 जून रोजी पहाटे 5 वाजता माखन चहा पीत असताना त्याने आरतीला विचारले की लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही ती घर का उध्वस्त करत आहे? या मुद्द्यावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात माखनने आरतीच्या डोक्यावर हातोड्याने वार केले. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी मुले त्यांच्या मावशीच्या घरी होती.
हे ही वाचा: भाऊजीला पाय तुटेपर्यंत मारलं...पत्नीला कंटाळल्यानं वेगळं राहायचा निर्णय, मेहुणा अन् सासूची मारहाण
सरपंचाकडे जाऊन केला गुन्हा कबूल
पत्नीची हत्या केल्यानंतर, माखन माजी सरपंच जगसीर यांच्या घरी पोहोचला. त्याने सरपंचांना संपूर्ण सत्य सांगितलं. तो म्हणाला की "मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे. मला पोलिसांच्या स्वाधीन करा नाहीतर परिणाम वाईट होतील." यानंतर, सरपंचांनी माखन यांना पोलिस स्टेशनमध्ये नेले आणि संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली.
हे ही वाचा: राजा-सोनम हनिमून प्रकरण : पोलिसांच्या समोर येताच सोनम ढसाढसा रडली..हत्येच्या कटाबाबत सर्वच सांगितलं!
पोलिसांच्या माहितीनुसार, काय घडलं?
सिरसा सदर पोलिस स्टेशनचे प्रभारी सुखदेव सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, माखनची पत्नी आरती हिचे एका पुरुषाची अवैध संबंध होते. त्यामुळे माखन त्याच्या पत्नीशी भांडत असे. यामुळे काल संध्याकाळी त्यांच्यात भांडण झाले आणि आज पहाटे 5 वाजता माखनने आपल्या पत्नीची हत्या केली. आता पोलीस आरोपी माखन सिंगची चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT
