भाऊजीला पाय तुटेपर्यंत मारलं...पत्नीला कंटाळल्यानं वेगळं राहायचा निर्णय, मेहुणा अन् सासूची मारहाण

मुंबई तक

Beed Crime : रामहरी मोरे असं मारहाण झालेल्या पतीचं नाव आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात त्यांचं लग्न झालं होतं. पत्नीसह बीडमध्ये भाड्याच्या घरात राहत असताना दोघांमध्ये सतत वाद होत होते. त्यानंतर त्यांनी वेगळं राहायचा निर्णय घेतला होता.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

बीड : बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत. अशातच एका घटनेत लग्नानंतर सततच्या भांडणांना कंटाळून पतीने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र याचा राग आल्यानं पत्नी, सासू आणि मेहुण्याने मिळून पतीचा पाठलाग करत त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बीडजवळ घडली. या मारहाणीत पतीचा डावा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पत्नी, सासू, मेहुणा आणि मेहुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> पुढच्या चाकाखालून वाचली, पण मागच्या चाकाखाली आली महिला, अपघाताचं धडकी भरवणारं CCTV

रामहरी मोरे असं मारहाण झालेल्या पतीचं नाव आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात त्यांचं लग्न झालं होतं. पत्नीसह बीडमध्ये भाड्याच्या घरात राहत असताना दोघांमध्ये सतत वाद होत होते. याला कंटाळून रामहरीने बीडमध्येच दुसऱ्या ठिकाणी खोली भाड्याने घेऊन राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय त्यांच्या पत्नीला खटकला. 

तिने आपल्या भावाकडे तक्रार केली. यानंतर रामहरीच्या मेहुण्याने चारचाकी गाडीतून रामहरीचा पाठलाग केला आणि रस्त्यात त्याला गाठलं. तिथं पत्नी, सासू आणि मेहुण्याने मिळून रामहरीला दगडाने आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात रामहरीचा डावा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला.

हे ही वाचा >> हनिमून हत्याकांड: वडिलांचा मोठा खुलासा, 'लग्नानंतरही सोनम आणि राजामध्ये नव्हते संबंध...'

जखमी रामहरीवर बीड येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी त्यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पत्नी, सासू, मेहुणा आणि मेहुणीविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली असून, कौटुंबिक वादाचे हिंसक स्वरूप पुन्हा एकदा समोर आले आहे.