मुंबईतील मुलुंड मेट्रो स्टेशनचे काम सुरु असताना स्लॅब कोसळला, दुर्घटनेत दोघेजण गंभीर जखमी

मुंबई तक

14 Feb 2026 (अपडेटेड: 14 Feb 2026, 04:48 PM)

Mumbai News : मुंबईतील मुलुंड मेट्रो स्टेशनचा स्लॅब कोसळल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मेट्रोचे बांधकाम सुरु असताना ही दुर्घटना घडली आहे, ही घटना शनिवारी 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:20 वाजता घडली. एलबीएस रोडवरील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मेट्रोचे बांधण्यात सुरु असताना मेट्रोच्या खांबाचा एक भाग कोसळला, या दुर्दैवी घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

Mumbai News

Mumbai News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील मुलुंड मेट्रो स्टेशनचा स्लॅब कोसळल्याने दोघेजण जखमी

point

मेट्रोचे बांधकाम सुरु असताना दुर्घटना

Crime News : मुंबईतील मुलुंड मेट्रो स्टेशनचा स्लॅब कोसळल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मेट्रोचे बांधकाम सुरु असताना शनिवारी 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:20 वाजता ही घटना घडल्याचं वृत्त आहे. एलबीएस रोडवरील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मेट्रोचे बांधकाम सुरु असताना मेट्रोच्या खांबाचा एक भाग खाली कोसळला, या दुर्दैवी दुर्घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा :  जामखेड : 'आमच्या भावने मुलीला बघून आईला का सांगितले?', तिघांनी एक खून केला

मेट्रोच्या स्लॅबचा एक तुकडा ऑटोरिक्षावरला

घडलेल्या घटनेनुसार, मेट्रोच्या स्लॅबचा एक तुकडा ऑटोरिक्षवरती कोसळला. या घटनेत तीन - चार जण गंभीर जखमी झाले आहेत, तिघांची प्रकृती गंभीर असून एकाचा मृत्यू झाला आहे. रिक्षासह चारचाकी वाहने स्लॅब खाली अडकून बसली होती. या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे. 

108 रुग्णवाहिका घटनास्थळी

संबंधित तंत्रज्ञान अग्निशमन विभाग, पोलिस कर्मचारी, मेट्रो कर्मचारी, वॉर्ड एक्सप्रेस 108 रुग्णवाहिका घटनास्थळी ठळकपणे आणि त्यांनी संरक्षण सुरू ठेवले. दरम्यान, मेट्रोचं काम असताना सूचना फलक लावला नसताना बसला स्थानिकांनी दिली.