Pune Crime: पुण्यातील कोंढवा येथून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) येथे राहणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणाला अल-कायदा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आक्षेपार्ह साहित्य बाळगल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपीचं नाव जुबेर हुंगरकर (33) असं असून कोंढवा, वानवडी आणि भोसरी भागात शोधमोहीम राबवताना एटीएस अधिकाऱ्यांना त्याच्या लॅपटॉपवर अतिरेकी साहित्य आढळल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं.
ADVERTISEMENT
मुख्य शहरांमध्ये बॉम्बस्फोटांचा कट
मिळालेल्या माहितीनुसार, ATS ने एकाच वेळी बऱ्याच ठिकाणी छापे टाकले आणि सुमारे 19 संशयितांची चौकशी केली. तपासादरम्यान, महत्त्वाचे डॉक्यूमेंट्स आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली. एका खाजगी सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या आणि बी.टेक पदवी असलेल्या हुंगरकरने कोंढवा परिसरातून दहशतवादी आरोपाखाली अटक केलेल्या व्यक्तींशी संबंध विकसित केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं. खरं तर, 2023 मध्ये कोंढवा येथील मीठानगर परिसरातून अटक केलेले दहशतवादी मुंबई, पुणे आणि गुजरातमधील मुख्य शहरांमध्ये बॉम्बस्फोटांचा कट रचत असल्याचं आढळून आलं. राष्ट्रीय तपास यंत्रणा (ANI) च्या चौकशीतून मिळालेल्या माहितीप्रमाणे, आरोपींनी कोल्हापूर आणि सातारा येथील जंगली भागात ड्रोन बॉम्ब प्रशिक्षण आणि टेस्ट देखील केली होती.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबई मेट्रो-3 ला मिळणार पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग... कुठे बनणार नवा मार्ग?
आरोपीला ‘असं’ घेतलं ताब्यात
गुप्त माहिती आणि त्या पूर्वीच्या नेटवर्कशी संबंधित अनेक संशयितांवर पाळत ठेवल्यानंतर, एटीएसने नुकतेच नवीन छापे टाकले. त्यावेळी, आरोपी हुंगरकरचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आणि तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला. त्यामध्ये अल-कायदाशी संबंधित साहित्य असल्याचं स्पष्ट झालं. टेक्निकल बाबींच्या आधारे, एटीएस पथकांनी चेन्नईतील एका कार्यक्रमातून परतल्यानंतर पुणे रेल्वे स्टेशनपर्यंत आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर तिथून त्याला लगेच त्याच्या एका सहकाऱ्यासह ताब्यात घेण्यात आलं आणि नंतर त्याला अटक करण्यात आली.
हे ही वाचा: नागपुरात रक्षक पुन्हा बनले भक्षक, पोलिसाकडून 23 वर्षीय तरुणीचा लैंगिक छळ, पीडितेचे सनसनाटी आरोप
आरोपीविरुद्ध खडक चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं, अखेर, त्याला 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एटीएस आता संभाव्य स्थानिकांची चौकशी आणि संवाध साधून पुण्यातून कार्यरत असलेल्या व्यापक दहशतवादी नेटवर्कबद्दल माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.
ADVERTISEMENT











