पुण्यातील वारजेत पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध, विवाहितेचा वेगळ्या गोळ्या देऊन गर्भपात

मुंबई तक

• 04:58 PM • 08 Mar 2026

Pune Crime : पुणे वारजे परिसरात राहणाऱ्या एका वैवाहित महिलेनं पती, सासू, दिर आणि जावेकडून सातत्याने मानसिक-शारीरिक छळ, पैशांची मागणी आणि गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी रामनगर पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला. संबंधित प्रकरणात 33 वर्षीय महिलेनं तक्रार दाखल केली. 

Pune Crime

Pune Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सुनेचा पती आणि सासरच्यांनी टोमणे, शिवीगाळ करत मानसिक छळ

point

पतीचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध अन् नंतर मारहाण

Pune Crime : आदित्य भावर - पुणे वारजे परिसरात राहणाऱ्या एका वैवाहित महिलेनं पती, सासू, दिर आणि जावेकडून सातत्याने मानसिक-शारीरिक छळ, पैशांची मागणी आणि गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी रामनगर पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला. संबंधित प्रकरणात 33 वर्षीय महिलेनं तक्रार दाखल केली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'तु मला आवडतेस', म्हणत जालन्यात सासऱ्याने सुनेला मागून मिठीत धरले, नंतर खाली पाडून...

सुनेचा पती आणि सासरच्यांनी टोमणे, शिवीगाळ करत मानसिक छळ

संबंधित प्रकरणात दिलेल्या तक्रारीनुसार, 8 डिसेंबर 2019 रोजी संबंधित महिलेचे अमित शिंदे यांच्या कुटुंबाच्या संमतीने लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांत लग्नसमारंभात अपेक्षेहून सन्मान मिळत नसल्याचे म्हणत पती आणि सासरच्यांनी टोमणे, शिवीगाळ करत मानसिक छळ केला. सणांना महागड्या आणि भेटवस्तू आणण्याचा दबाव टाकला होता. 

तिच्या नावाने बँक खाते उघडून व्यवसायासाठी वापर केल्याची तक्रार

पतीचा मोबाईल व्यवसाय असल्याने तक्रारदार महिलेला दुकानाचे अकाउंट पाहण्यास सांगितले. मात्र कामाच्या निमित्ताने दुकानात गेल्यावरही तिचा अपमान केला जात असल्याचा आरोप करण्यात आला. तिच्या नावाने बँक खाते उघडले आणि त्याचा वापर व्यवसायासाठी केल्याची तक्रार करण्यात आली. 

पतीचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध अन् नंतर मारहाण

महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, पतीचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा प्रश्न विचारल्याबाबत तिला मारहाण करण्यात आली. 2023 मध्ये आजारपणाच्या वेळी पतीने वेगवेगळ्या गोळ्या दिल्याने गर्भपात झाल्याचा गंभीर आरोप महिलेनं केला. तसेच दिराने वेळोवेळी अयोग्य स्पर्श करून त्रास दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

हे ही वाचा : बलात्कार पीडितेकडे गावाला मटण अन् दारुची पार्टी देण्याची मागणी, पंचायतीचा अजब निर्णय; पोलिस काय करताहेत?

कुटुंबातील वाद वाढल्याने फेब्रुवारी 2026 मध्ये महिलेला अनेक धमक्या दिल्या जाऊ लागल्या होत्या. संबंधित तक्रारीनुसार, पती अमित शिंदे, सासू अरुणा शिंदे दिर सागर आणि गौरव शिंदे तसेच जाऊ रुचिरा आणि श्रेया शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.