"मित्रांना हा व्हिडीओ शक्य तेवढा व्हायरल करा, धीस इज माय सुसाईड व्हिडीओ..." हे शब्द होते इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारणाऱ्या तरूणाचे. पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीमध्ये एका तरूणानं इमारतीच्या सहाव्या मजल्यावर उडी घेत स्वत:ला संपवलं. मृताचं नाव तेजस बाजीराव सोनागरे (20) असं आहे. हा तरूण देहूगावचा रहिवासी आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सोनागरे यांनी हिंजवडीतील फेज 2 मधील कंपनीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>टार्गेट पूर्ण झालं नाही म्हणून, कुत्र्यासारखं गळ्यात पट्टा बांधला, कंपनीतला व्हायरल व्हिडीओ काय?
पोलिसांकडून दोघांना अटक
पिंपरी चिंचवड पोलिसांनी नुकतेच दोघांना अटक केली आहे. या घटनेबद्दल बोलताना पोलिसांनी सांगितलं की, आत्महत्या करण्यापूर्वी 20 वर्षीय तरुणाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये, मृताने त्याच्या दोन चुलत भावांमुळेच आपण हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचा आरोप केला होता. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार व्हिडिओ नोटमध्ये मृताने म्हटलं आहे की, त्याचे चुलत भाऊ त्याचा पगार विचारायचे, किती पैसे उरले, किती खर्चा झाले असे सवाल करायचे. यालाच कंटाळून त्या तरूणाने 12 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 10 वाजता इमारतीवरुन उडी घेतली होती.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तेजसने इमारतीवरुन उडी घेण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवला होता. व्हिडिओ शक्य तितका व्हायरल करा असं आवाहनही त्याने केलं होतं. तेजस सोनागरे याच्या आत्महत्येनंतर, पोलिसांनी घटनेसंदर्भात अपघाती मृत्यूचा अहवाल नोंदवला होता. घटनेमागे कारण काय आहे हे शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू होता. दोन्ही चुलत भावांचा या प्रकरणात सहभाग असल्याचं स्पष्ट झाल्यावर, शुक्रवारी, 4 एप्रिल रोजी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा >>हॉटेल मालकाला बाहेर काढलं, लाथा-बुक्क्यांनी, बेल्टने मारलं! बारामतीतल्या 'त्या' व्हिडीओवर दादाही संतापले
तपास अधिकारी असलेले पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर झोल यांनी सांगितलं की, आपल्या पालकांना गमावलेला तेजस हा एका खाजगी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. दोन चुलत भाऊ सतत त्याच्या कमाई आणि बचतीबद्दल विचारत असल्यानं तो अस्वस्थ होता. त्यातूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचललं.
ADVERTISEMENT











