Pune Crime : पुणे शहरात गुन्हेगारीसह आता चोरीच्या प्रमाणात मोठ्या वाढ होऊ लागली आहे. चोरांनीही अशी शल्लक लढवतच चोरी केली आहे. चोरांनी चोरी करताना महिलांचा वेष परिधान करून रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतून दोन लाखांची चोरी केली होती. तांब्याच्या तारांचा बंडल चोरी केल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरु असून दोन सराईत गुन्हेगारांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : धावत्या ट्रॅव्हल्समध्ये अंगावर पेट्रोल ओतून घेतलं पेटवून, प्रवाशांनी पाहिलं अन्... भयंकर घटना
डोकं लावून केली चोरी पण...
ही घटना पुण्यातील रामटेकव़डी परिसरातील औद्योगिक वसाहतीतील हरको ट्रान्सफॉर्मर कंपनीत 26 ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली होती. या घटनेनं औद्यागिक वसाहतीत भीतीचं वातावरण पसरलं आहे. या प्रकरणी आरोपी अमन अजीम शेख (वय 24), मुसा अबू शेख (वय 24) अशी चोरी करणाऱ्यांची नावे आहेत. आरोपीकडून दोन लाख 19 हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा आणि पट्ट्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
खिडक्यांचे लोखंडी गज तोडून चोरी
चोरटे एवढ्यावरच न थांबता त्यांनी खिडक्यांचे लोखंडी गज तोडले आणि प्रवेश केला होता. चोरट्यांनी पिवळा गाऊन, तर दुसऱ्याने गुलाबी रंगाचा सलवार आणि कमीज परिधान केला होता. त्यानंतर त्यांनी तोंडालाही स्कार्फ बांधलेलं आढळून आलं. या प्रकरणाची माहिती कंपनी मालकाला समजताच त्याने पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दाखल केली.
हे ही वाचा : 'मुंबईत मोर्चाला जायला पैेसे नाहीत मी घरीच...' नैराश्यात येऊन आणखी एका मराठा तरुणानं औषध पिऊन उचललं टोकाचं पाऊल
वनवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात चोरट्यांनी महिलांचे कपडे परिधान केल्याचं दिसून आलं. अशातच आता पोलिसांनी दोन्ही चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित प्रकरणात चोरी केलेल्या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच पोलीस पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
