पुणे : ऑपरेशनसाठी रुग्णालयात आली महिला, पण डॉक्टरच्या मनात काहीतरी वेगळंच; काय घडलं?

मुंबई तक

15 Jun 2026 (अपडेटेड: 16 Jun 2026, 11:33 AM)

Pune crime : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डॉक्टरांनीच एका महिला रूग्णाचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. आकुर्डी येथील चेतना रुग्णालयात घडलेल्या या घटनेनं पोलिसांनी संबंधित डॉक्टरला अटक केली. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

Pune crime

Pune crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

महिलेशी अश्लील वर्तन विनयभंग

point

डॉ. धैर्यशील शेटके यांच्यावर गुन्हा दाखल

Pune Crime : कृष्णा पांचाळ - पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डॉक्टरांनीच एका महिला रूग्णाचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. आकुर्डी येथील चेतना रुग्णालयात घडलेल्या या घटनेनं पोलिसांनी संबंधित डॉक्टरला अटक केली. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. पाठीच्या कण्याच्या भागात शस्त्रक्रिया करण्यासाठी 37 वर्षीय महिलेला 8 जून रोजी आकुर्डीतील चेतना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, नंतर 11 जून रोजी तिच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : दीराचे वहिनीशी प्रेमसंबंध, नणंदेनं नको त्या अवस्थेत पाहिलं अन्..

महिलेशी अश्लील वर्तन, विनयभंग

संबंधित प्रकरणात आरोपीची ओळख डॉ. धैर्यशील शेटके अशी ओळख समोर आली. महिलेशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. या घडलेल्या प्रकारामुळे ती महिला दचकली आणि तिने मोठ्याने आरडाओरड केली. तिच्या ओरडण्याने रुग्णालयात एकच खळबळ उडाली. 

हे ही वाचा : रुणाकडून अभिजीत दीपकेला मारहाण, Video व्हायरल

डॉ. धैर्यशील शेटके यांच्यावर गुन्हा दाखल

ज्या दिवशी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला तेव्हा त्या महिलेचा पती तिथेच होता. त्यांनी तात्काळ निगडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेनं केलेल्या तक्रारीवरून डॉ. धैर्यशील शेटके यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. आकुर्डीतील घडलेल्या या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. निगडी पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.