Pune Crime : राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचं माहेरघर अशी पुण्याची ओळख आहे. मात्र, पुणे तिथं काय उणे हे वाक्य पुण्यासाठी साजेसं असल्याचं नव्याने पाहता येतं. पुण्यात मित्राच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी फटाके नव्हते म्हणून मित्रप्रेम उफाळलेल्या तरुणाने हवेत गोळीबार केला. ही घटना पुण्यातील बावधन परिसरातील वृंदावन फार्म हाऊस सुसगाव येथे घडली आहे. या घटनेनं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मोठी बातमी! जयंत पाटील यांचा शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, 'हा' नेता पदभार सांभाळणार
कुमार खळदकर नावाच्या तरुणाचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. तेव्हा त्याचा आरोपी मित्र दिनेश सिंह नावाच्या तरुण त्या ठिकाणी आला. त्यानंतर दिनेश सिंगच्या वाढदिवशी फटाके नसल्याचे समजले असता त्याने हवेत दोन राउंड फायर करत मित्राचा वाढदिवस साजरा केला.
संबंधित प्रकरणात आता आरोपी दिनेश सिंगला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बावधन येथील शहरालगतच सुस गावातील रवीनगर येथील वृंदावन फार्म हाऊसवर 8 जुलै रोजी घडली. या घटनेनंतर दिनेश सिंग बाबूलाल सिंगला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्याकडे असलेले परवाना पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.
हेही वाचा : तीन वर्षांपासून होतं जीवापाड प्रेम, बहिणीने चौकात सोडलं अन् तरुणी गायब, अखेर तरुणासोबत जंगलात...
नेमकं काय घडलं ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बावधन परिसरातील वृंदावन फार्म हाऊसच्या केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून हे प्रकरण उघडकीस आलं आहे. कुमार खदळकर नावाच्या तरुणाचा वाढदिवसानिमित्त काही लोकांसाठी पार्टी आयोजित करण्यात आली होती. पार्टी सुरु असतानाच दिनेश सिंग नावाच्या तरुणाने अचानकपणे पिस्तुल बाहेर काढले आणि हवेत गोळीबार केला. पार्टीमुळे आयोजित पार्टीतील तरुणांचा मोठा गोंधळ सुरु असल्याने नेमका गोंगाट कुठे झाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT
