जुन्नर: पोटच्या लेकानं बापासह सख्ख्या भावाला दगडाने ठेचून संपवलं, मृतदेहाशेजारी रात्रभर...

मुंबई तक

03 Jun 2026 (अपडेटेड: 03 Jun 2026, 10:00 PM)

Pune crime : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आदिवासी भागातील पारगाव तर्फे मढ गावातील परिसरात बगाडवाडी येथे पोटच्या मुलानेच आपल्या वडिलांसह सख्ख्या भावाची हत्या केली.

Pune crime

Pune crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार

point

पोटच्या मुलानेच वडिलांसह सख्ख्या भावाला संपवलं

Pune Crime : Raichand Shinde - पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आदिवासी भागातील पारगाव तर्फे मढ गावातील परिसरात बगाडवाडी येथे पोटच्या मुलानेच आपल्या वडिलांसह सख्ख्या भावाची हत्या केली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत वडील जयराम महादू मुकणे (वय 65) आणि मुलगा राजू जयराम मुकणे (वय 30) यांची दगडाने ठेचून हत्या केल्याचा आरोप आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : शुक्र ग्रहाचा पुष्प नक्षत्रात प्रवेश, 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

आरोपी दोन्ही मृतदेहांच्या शेजारी झोपून राहिला

या घटनेतील बाब अशी की, हत्या करण्यात आलेल्या आरोपीची बाबाजी मुकणे अशी ओळख असून तो रात्रभर दोन्ही मृतदेहांच्या शेजारी झोपून राहिला होता. सकाळी शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या स्थानिक नागरिकांना मृतदेह आढळून आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला, दरम्यान नागरिकांनी ओतून पोलिसांना माहिती देत तपास केला. 

कौटुंबिक वादातून घटना घडल्याचा संशय

संबधित घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर ओतून ग्रामीण रूग्णालयात पाठवले. प्राथमिक तपासातून कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र यामागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू केली जात आहे. 

हे ही वाचा : रोहित पवारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, नवी मुंबईत काय घडलं?

या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण जुन्नर तालुका हादरून गेला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान या प्रकरणाता अधिक तपास ओतूर पोलीस करत आहेत.