पुण्यातील बुधवार पेठेत वेश्या व्यवसायाच्या नावाखाली सुरू होतं भलतंच...

Pune Crime News : पुण्यातील बुधवार पेठेत वेश्यव्यवसायाच्या नावाखाली सुरू असणाऱ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा केला आहे.

pune crime news drug racket in the name of prostitution in Pune's Budhwar Peth

pune crime news drug racket in the name of prostitution in Pune's Budhwar Peth

मुंबई तक

18 Jun 2025 (अपडेटेड: 18 Jun 2025, 04:45 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील बुधवार पेठेत एक अंमली पदार्थांची तस्करी

point

जाणून घ्या नेमकं प्रकरण

Pune Crime News : पुण्यातील बुधवार पेठेत वेश्यव्यवसायाच्या नावाखाली सुरू असणाऱ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा केला आहे. या घटनेत तस्करी करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यन पुण्यात गुन्हेगारी आणि हिट अॅन्ड रनसारख्या घटना पुण्यात घडत आहेत. त्यानंतर आता पुण्यामध्ये अंमली पदार्थांची तस्करी केल्याच्या अनेक घटना घडत आहेत. 

हे वाचलं का?

हेही वाचा : आधी पतीला भेटली, नंतर OYO हॉटेलमध्ये भलत्याच पुरुषासोबत गेली; पण दिराने सगळा खेळच...

वेश्यव्यवसायाच्या नावाखाली पुण्यात ड्रग्स रॅकेट 

पुण्यातील बुधवार पेठेत वेश्यव्यवसायाच्या नावाखाली चालणाऱ्या ड्रग्स तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा केला आहे. आक्का या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका महिला सेक्स वर्करने आणि ग्राहकांना मेफेड्रोन पुरवत असल्याचे आढळून आलं, यामुळे तिला अटक करण्यात आली आहे. दरम्यान आरोपीचे नाव ज्योती सुनील यादव उर्फ कट्टीमणी (वय 50) असून ती महिला कात्रजची रहिवासी आहे. 

या प्रकरणात आता पोलिसांनी तपास केला असता, ती तिच्या भावासोबत मिळून संपूर्ण रॅकेट चालवत होती, अशी माहिती आता समोर आली आहे. हे सर्व रॅकेट पुण्यातील बुधवार पेठेतील गल्लीत मेफेड्रोन विकण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी शरणप्पा कट्टीमणीला गुलबर्गा कर्नाटक येथून अटक केली आहे. 

शरणप्पाकडे अंदाजे 12.12 लाख रुपयांचे 59 ग्रॅम एमडी आढळले. चौकशीच्यादरम्यान, त्याने याबाबत कबूली दिली आहे. हे ड्रग्ज त्याच्या बहिणीनेच म्हणजेच ज्योती यादवने पुरवले होते. 

हेही वाचा : पुरोगामी महाराष्ट्र हादरला; धार्मिक संस्थेत विद्यार्थ्याला शॉक देऊन जीवं मारलं, कारण ऐकून अंगावर येईल काटा

या प्रकरणात पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, डीसीपी निखिल पिंगळे यांच्या आदेशानुसार अटक करण्यात आली आहे. 

    follow whatsapp