'रील स्टार' महिला पोलीस बनल्या खंडणीखोर, प्राचार्याला ब्लॅकमेल करून लाखो उकळले; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

Pune Crime News : पुण्यातील एका महिला प्राचार्याला ब्लॅकमेल करुन 7 लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे या प्रकरणात कायद्याचे रक्षकचं भक्षक बनले आहेत.

Pune Crime News

Pune Crime News

मुंबई तक

09 Apr 2026 (अपडेटेड: 09 Apr 2026, 11:20 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'रील स्टार' महिला पोलीस बनल्या खंडणीखोर

point

प्राचार्याला ब्लॅकमेल करून लाखो उकळले; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

Pune Crime News : पुणे शहरातील पोलीस दलालाच भ्रष्ट कारभार समोर आणणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिला प्राचार्याला ब्लॅकमेल करत तब्बल 7 लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Surya Gochar 2026 : सूर्य करणार उच्च राशीत प्रवेश, भाग्य उजळणार की अडचणी वाढणार? काय सांगते तुमची रास?

महिला प्राचार्याला पॉक्सो कायद्यांतर्गत अटक करण्याची भीती दाखवली 

या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, कर्मचारी सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील कर्मचारी तसेच सोशल मीडियावर ‘रील स्टार’ म्हणून ओळखली जाणारी सोनाली हिंगे यांचा समावेश आहे. आरोपींनी संबंधित महिला प्राचार्याला पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची भीती दाखवत पैशांची मागणी केली होती. भीतीपोटी पीडित महिलेकडून तब्बल 7 लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी पोलीस हे शाळेत गुड टच बॅड टच प्रशिक्षण द्याला जात होते, या दरम्यान पीडित महिलेला हेरून कट रचून हा सगळा प्रकार केला आहे. 

हेही वाचा : बांधकाम सुरु असलेल्या खोलीत 13 वर्षीय मुलीचे हात-पाय बांधले, पाच जणांनी मिळून पीडितेची अंधारात अब्रू लुटली

सध्या अजित बडे हे सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत असून सोनाली हिंगे आणि सुदाम तायडे हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नियुक्त आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या प्रकारामुळे पोलिस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून, अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

लग्नानंतर नवऱ्याने फक्त एकदाच ठेवले शारीरिक संबध, बायकोच्या हाती लागली 'ती' फाईल अन् घडलं भयानक कांड