दारू पितो म्हणून सख्खा भाऊ झाला पक्का वैरी, आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीवर लैंगिक अत्याचार

Pune Crime : पुण्यातील वारकरी सांप्रदायाच्या शिक्षण संस्थेत तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणात एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

pune crime sexual assault

pune crime sexual assault

मुंबई तक

15 Jul 2025 (अपडेटेड: 15 Jul 2025, 12:50 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात वाढती गुन्हेगारी

point

तरुणीवर वारकरी शिक्षण संस्थेत लैंगिक अत्याचार

Pune Crime : पुण्यात वाढत्या गुन्हेगारीने नकोसं करून ठेवलं आहे. शिक्षणाचं माहेरघर अशी पुण्याची ओळख आहे. तसेच पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पण आता याच पुण्यात दररोज गुन्हेगारीच्या भयंकर घटना घडतात. पुण्यातील बिबवेवाडीत दारू पिऊन त्रास देणाऱ्या लहान भावाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रवीण उर्फ ऋतिक दत्तात्रेय नवले (वय 24) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर या प्रकरणी अनिल दत्तात्रेय नवले (वय 26) असे अटकेत असणाऱ्या तरुणाचे नाव आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : पुणे तिथं काय उणे! फिर्याद दाखल करणाऱ्यांवर कोयत्याने सपावर वार, नेमका वाद काय?

नेमकं काय घडलं? 

प्रवीण आणि अनिकेत हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. मात्र, दोघांमध्ये केवळ दारूमुळे वाद झाला अन् क्षणार्धात ते एकमेकांचे वैरी झाली. ते दोघेही बिवबेवाडी येथील रहिवासी आहेत. प्रवीण हा बेरोजगार होता आणि त्यात त्याला दारूचं व्यसन होतं. दारूसाठी पैसे मागून तो कुटुंबियांना त्रास द्यायचा. सोमवारी 14 जुलै रोजी सकाळी प्रवीणला त्याचा भाऊ अनिकेतनं दारू न पिण्याबाबत अनेकदा समजावून सांगितले. दारू पिऊन आम्हाला त्रास देऊ नका, असे त्याने प्रवीणला सांगितले. त्यावर प्रवीणने अनिकेतशी वाद घालण्यास सुरुवात केली. याच वादातून अनिकेतनं प्रवीणवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात प्रवीण गंभीर जखमी झाला असता, त्याला स्थानिकांनी तात्काळपणे रुग्णालयात दाखल केलं. तसेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीवर लैंगिक अत्याचार

दरम्यान, पुण्यातील आळंदी येथील केळगाव रस्त्यावर एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणात एका किर्तनकार महिलेचाही सहभाग असल्याचं या प्रकरणातून उघडकीस आलं आहे. 

संबंधित प्रकरणात पीडितेनं पाच जणांविरोधात लैंगिक शोषण, अपहरण, धमकी आणि जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली. या घटनेचा निषेध करत सखल मराठा समाजाने आळंदी पोलीस ठाण्यात कारवाईची मागणी केली आहे. 2 जून 2025 रोजी पीडित तरुणी तिच्या घरी घरी एकटीच असताना ओळखीच्याच एका महिलेनं तिला शेताकडे जात असल्याचं खटं सांगितलं. त्यानंतर तिला घराबाहेर नेण्यात आलं.  

हेही वाचा : कोकणासह रायगड आणि रत्नागिरीत जोराचा पाऊस बरसणार, पुणे आणि साताऱ्यातील 'या' भागांत मान्सूनची स्थिती काय?

याचदरम्यान, वाटेत काळ्या रंगाच्या इर्टिगा गाडीतून आलेल्या आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे आणि एका अनोळखी चालकाने तरुणीवर हात टाकला आणि तिचं अपहरण केलं. त्यावेळी तिनं आरडाओरडा केली असता, ते इथवर न थांबता अॅसिड टाकण्याची देखील धमकी दिली होती.  नंतर त्या पीडितेला आळंदी येथील खासगी मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत नेण्यात आले. तिथे त्या तिघांनीही पीडितेला एका खोलीत डांबलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. फिर्यादीनुसार, या ठिकाणी आण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली.  

    follow whatsapp