वारकऱ्यांना अडवून कोयत्याचा धाक दाखवून लुटलं, चिमुकलीवर बाजूला नेत अत्याचार, दौंडमध्ये संताप

मुंबई तक

30 Jun 2025 (अपडेटेड: 30 Jun 2025, 04:24 PM)

मिळालेल्या माहितीनुसार, विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांनी वाटेत चहासाठी थांबले. यावेळी दोन अज्ञात व्यक्ती गाडीवरून आल्या आणि त्यांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावून लूटमार केली.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील दौंडमध्ये संतापजनक घटना

point

पंढरपूरला निघालेल्या कुटुंबाला गुंडांनी अडवून लुटलं

point

चिमुकलीला बाजूला नेऊन तिच्यावरही केले अत्याचार

Pune Crime : राज्यभरातून लाखो वारकरी आषाढी वारीच्या भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे निघतात. संपूर्ण महाराष्ट्रात उत्साह आणि चैतन्याची लहर पसरलेली असताना, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीत मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे. पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना लुटून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.एबीपी माझाने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>लग्नाआधीच राहिली गरोदर; रागात वडिलांनी मर्यादाच सोडल्या, जंगलात जाऊन मुलीसोबत...

वारकऱ्यांसोबत काय घडलं? 

मिळालेल्या माहितीनुसार, विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांनी वाटेत चहासाठी थांबले. यावेळी दोन अज्ञात व्यक्ती गाडीवरून आल्या आणि त्यांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावून लूटमार केली. यानंतर या आरोपींनी एका अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेले आणि तिच्यावर अत्याचार केले.

दौंड परिसरात संतापाचं वातावरण

या घटनेने दौंड परिसरात संतापाची लाट पसरली आहे. दौंड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र, या आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

हे ही वाचा >>"पतीची हत्या करुन, दागिने घेऊन पळाली...", विकासच्या दुसऱ्या पत्नीचे तिसऱ्या पत्नीवर आरोप, प्रकरण काय?​​​​​

दरम्यान, यापूर्वीही आषाढी वारीदरम्यान एक गैरप्रकार समोर आला होता. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील काही भाविकांना सासवड परिसरात ‘देवाच्या टोकन दर्शनाचे पास १०० रुपयांना’ देण्याचे आमिष दाखवून बोगस पास विकण्यात आले होते. विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी पोहोचलेल्या भाविकांनी हे पास दाखवले असता, स्कॅनिंगदरम्यान ते बनावट असल्याचे उघड झाले.