पुणे : पुण्यात दिवसेंदिवस घडणाऱ्या वेगवेगळ्या धक्कादायक घटना घडत आहेत. या घटनांमुळे शिक्षण आणि नोकरीसाठी बाहेर राहणाऱ्या तरूणांच्या पालकांची चिंता वाढतेय. नुकतीच हिंजवडीतील द क्राउन ग्रीन सोसायटीमध्ये शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली. एका 25 वर्षीय आयटी इंजिनीअरने 21व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मृत तरुणीचं नाव अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबरे असं असून ती हिंजवडी आयटी पार्कमधील एका आंतरराष्ट्रीय कंपनीत सॉफ्टवेअर टेक्निशियन म्हणून कार्यरत होती.
ADVERTISEMENT
लिफ्टने 21 व्या मजल्यावर जाऊन उडी मारली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा शुक्रवारी सकाळी तिच्या मैत्रिणीच्या सोसायटीत दुचाकीवरून आली. तिने लिफ्टद्वारे 21व्या मजल्यावर प्रवेश केला आणि तिथून उडी मारली. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सोसायटीच्या पार्किंगमध्ये सापडलेल्या दुचाकीच्या आधारे तिची ओळख पटवण्यात आली. तिचा मृतदेह पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल (YCMH) मध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
हे ही वाचा >> अहो राव! काय ते आजचे सोन्याचे भाव, 24 कॅरेट सोनं पुन्हा महागलं, तुमच्या शहरात आजचे दर काय?
खोलीत रक्ताचे डाग
पोलिसांनी अभिलाषाच्या मैत्रिणीशी संपर्क साधला.तिच्याचसोबत अभिलाषा राहत होती. मैत्रिणीने सांगितलं की, अभिलाषा मध्यरात्री 1 वाजेपर्यंत खोलीत होती. सकाळी 5 वाजता जाग आल्यावर तिला अभिलाषा दिसली नाही आणि बाथरूमच्या भिंतीवर काही हलके रक्ताचे डाग दिसले. सुरुवातीला त्याकडे केलं. सकाळी 10 वाजता पुन्हा जाग आल्यावर अभिलाषा परतली नसल्याचं आणि तिचा फोन बंद असल्याचं लक्षात आलं. नंतर पोलिसांनी तिला घटनेची माहिती दिली. खोलीची पुन्हा तपासणी केल्यानंतर सॅनिटरी नॅपकिन, अंतर्वस्त्र आणि अभिलाषाच्या बेडवरील उशीच्या कव्हरवर रक्ताचे डाग आढळले.
चिठ्ठी सापडली
हे ही वाचा >> भर चौकात कोयते निघाले, दगड भिरकावले... बीडमध्ये गुन्हेगारांचा हैदोस सुरूच, नवा व्हिडीओ समोर
हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितले, "तपासादरम्यान पोलिसांना एक आत्महत्येची चिठ्ठी सापडली, ज्यामध्ये अभिलाषाने लिहिले आहे, 'मला यापुढे जगायचं नाही. मी हे स्वेच्छेने करत आहे.'” पोलिसांनी रक्ताने माखलेले सॅनिटरी नॅपकिन, अंतर्वस्त्रे, उशीचे कव्हर आणि तिचा मोबाइल फोन जप्त केला आहे. चिठ्ठीच्या आधारे पोलिसांचा अंदाज आहे की, अभिलाषा नैराश्याने ग्रस्त असावी, ज्यामुळे तिने हे पाऊल उचलले. तरीही, पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
