Pune hospital bomb case suspect detained : पुण्यातील हडपसर परिसरामध्ये एका रुग्णालयाजवळ बॉम्ब ठेवल्याप्रकरणी महाराष्ट्र ATSने अत्यंत मोठी कारवाई केली आहे. या घटनेतील मुख्य आरोपीला ATS ने नागपुरातून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी हा ट्रेन क्रमांक 18029 शालीमार एक्सप्रेसने प्रवास करून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. या अटकेमुळे पुण्यातील बॉम्ब प्रकरणाच्या तपासाला आता एक मोठे यश आले असून आरोपीची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : जावयाने सासरवाडीतच केलं कांड, मेहुण्याला दारु पाजली अन्..., नेमकं कारण काय?
रुग्णालयात बॉम्ब ठेवणारा आरोपीला नागपुरामधून अटक
दरम्यान, आरोपीला नागपुरात अटक केल्यानंतर आता लवकरच आरोपीला पुण्यात घेऊन येणार असल्याची माहिती आहे. त्याने पुण्यातल्या उषाकिरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब प्लांट केला होता. प्लांट करण्यामागचा उद्देश काय होता हे आता चौकशीतून समोर येईल. शिवाजी राठोड असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा : जावयाने सासरवाडीतच केलं कांड, मेहुण्याला दारु पाजली अन्..., नेमकं कारण काय?
सीसीटीव्हीमध्ये आरोपी दिसताच तपासाला वेग
रुग्णालयाच्या पार्किंग परिसरात ही बॉम्बसारखी संशयास्पद वस्तू नेमकी कोणी ठेवली होती आणि त्यामागे संबंधित व्यक्तीचा नेमका काय हेतू किंवा उद्देश असू शकतो, याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी तातडीने एक विशेष तपास मोहीम सुरू केली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. सीसीटीव्हीमध्ये आरोपीचा चेहरा स्पष्टपणे दिसल्यानंतर त्याला पकडण्याचा मार्ग सोपा झाला होता. प्राथमिक तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांना आरोपी ट्रेनने पळून जात असल्याचा सुगावा लागला. त्यानुसार नागपूर आरपीएफच्या मदतीने शालीमार एक्सप्रेसममधून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. या खळबळजनक प्रकरणाचा पुढील सखोल तपास आणि आरोपीची चौकशी आता पोलीस प्रशासनाकडून केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात बुधवारी संध्याकाळी झाली, जेव्हा पुण्याच्या हडपसर भागातील कामधेनू सोसायटीच्या पार्किंग एरियामध्ये एक संशयास्पद बॉम्बसारखी वस्तू आढळून आली होती. रुग्णालयाजवळ ही वस्तू सापडल्याने संपूर्ण पुणे शहरात आणि विशेषतः हडपसर परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सोसायटीच्या पार्किंग लॉटमध्ये बेवारस पडलेली ही संशयास्पद वस्तू स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली होती. नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली, ज्यानंतर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा वेगाने हलली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकांसह बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) तातडीने घटनास्थळी रवाना झाले होते. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ संपूर्ण परिसर सुरक्षितपणे वेढला आणि सर्वसामान्यांसाठी तो रिकामा केला. बॉम्ब शोधक पथकाकडून त्या संशयास्पद वस्तूची अतिशय बारकाईने तपासणी करण्यात आली आणि ती नेमकी काय आहे, याचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले. या संवेदनशील घटनेनंतर प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून आजूबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था कमालीची कडक केली होती, तसेच पोलिसांनी त्या परिसरात इतर ठिकाणीही कसून तपासणी मोहीम राबवली होती.
ADVERTISEMENT











