सोबत फिरायला गेले आणि गाडीतच मित्राचा जीव घेतला... मुळशीतील हादरवून टाकणारी घटना काय?

सर्वजण कारमध्ये बसले, तेव्हा चौघांनी मिळून सोनूवर सामूहिक हल्ला केला. टॉवेल आणि शर्टचा वापर करून त्यांनी सोनूचा गळा आवळून त्याची हत्या केली.

Mumbai Tak

मुंबई तक

22 Jun 2025 (अपडेटेड: 22 Jun 2025, 03:40 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील मुळशीमध्ये धडकी भरवणारं हत्याकांड

point

मित्रांनी गाडीतच गळा आवळून मित्राला संपवलं

पुणे : मुळशी परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या 35 वर्षीय तरुणाची त्याच्याच मित्रांनी गळा आवळून क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हानिफ अली सहाजमाल शेख उर्फ सोनू (रा. आजिवली, खालापूर, रायगड) असं मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार मित्रांविरुद्ध हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> दुकानाजवळ लघवी केली म्हणून वाद, मटन कापण्याच्या सुऱ्याने भोसकून हत्या, संभाजीनगरमधील घटना काय?

किरकोळ वाद, गाडीतच गळा आवळून मारलं...

मिळालेल्या माहितीनुसार, सोनू त्याचे मित्र शुभम यादव, अमर मोरे, आशिष चव्हाण आणि एका अल्पवयीन तरुणासह मुळशीमध्ये फिरायलागेले होते. मुळशीतील एका गोशाळेच्या शेडमध्ये सोनू आणि आशिष यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की दोघांनी लोखंडी हातोड्यांनी एकमेकांवर हल्ला केला.

यानंतर सर्वजण कारमध्ये बसले, तेव्हा चौघांनी मिळून सोनूवर सामूहिक हल्ला केला. टॉवेल आणि शर्टचा वापर करून त्यांनी सोनूचा गळा आवळून त्याची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह लोणावळ्याजवळील दुधीवरे गावाच्या खिंडीतील जंगलात फेकून दिला.

हे ही वाचा >> 'जर कोणाला सांगितलं तर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल...' महिला शिक्षिकेला तरुणांनी फ्लॅटवर नेलं अन्...​​​​​

सोनू घरी न परतल्यानं त्याच्या पत्नीने वावोशी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांनी चारही मित्रांना ताब्यात घेतलं. शुभम यादवच्या माहितीवरून पोलिसांनी दुधीवरे गावालगतच्या जंगलात सोनूचा मृतदेह शोधला. मृतदेहावर गळ्याभोवती कपडे बांधलेले, तोंडाला टॉवेल गुंढाळलेले आणि शर्टाने गळा आवळल्याचे आढळलं.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. हत्येचं कारण आणि कट कसा रचला गेला, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेने मुळशी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मित्रांमधील किरकोळ वादाने घेतलेल्या हिंसक वळणाने स्थानिकांना धक्का बसला आहे.

    follow whatsapp