दुकानाजवळ लघवी केली म्हणून वाद, मटन कापण्याच्या सुऱ्याने भोसकून हत्या, संभाजीनगरमधील घटना काय?

मुंबई तक

नितीन यांच्यावर आक्षेप घेत दुकानमालक मस्तान कुरेशी याने  वादाला सुरूवात केली. यातून वाद वाढला आणि भांडणाला हिंसक वळण लागलं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चिकन शॉपजवळ लघवी केल्यानं झाला होता वाद

point

लघवी करणाऱ्या तरूणाला सुऱ्याने भोसकून संपवलं

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी परिसरातील कुरेशी चिकन शॉपजवळ गुरुवारी रात्री एक थरकाप उडवणारी घटना घडली. रात्री उशिरा लघुशंकेसाठी थांबलेल्या 35 वर्षीय नितीन सांकपाळ याची चाकून वार करत हत्या करण्यात आली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दुकानमालकासह पाच जणांना अटक केली आहे.

हे ही वाचा >> पोहायला जातो सांगून गेले अन् परतलेच नाही... 17 तासानंतर सापडले दोन्ही भावांचे मृतदेह

अटक करण्यात आलेल्यांमध्ये मस्तान उर्फ नन्ना कुरेशी (वय 29), समीर खान (वय 19), बाबर शेख (वय 32), साजिद उर्फ सज्जू कुरेशी (वय 29) आणि नासिर खान (वय 20) यांचा समावेश आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन सांकपाळ याने आपला भाऊ आणि मित्रासह स्थानिक हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर कुरेशी चिकन शॉपमागे लघुशंका केली. 

मांस कापण्याचा सुरा खुपसून हत्या...

नितीन यांच्यावर आक्षेप घेत दुकानमालक मस्तान कुरेशी याने  वादाला सुरूवात केली. यातून वाद वाढला आणि भांडणाला हिंसक वळण लागलं. संतापाच्या भरात कुरेशी याने मांस कापण्याचा चाकू घेऊन तिघांवर हल्ला केला. यात नितीनचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघं गंभीर जखमी झाले.

हे ही वाचा >> डेटिंग ॲपवर मैत्री, नंतर लैंगिक शोषण आणि बळजबरीने गर्भपात... तरूणाने डॉक्टर तरूणीसोबत काय केलं?

आरोपींना जामीन

या प्रकरणात पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या तरतुदींसह भारतीय दंड संहितेच्या (BNS) हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव आणि दंगल यासारख्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी पाचही आरोपींना विशेष (SC/ST अत्याचार प्रतिबंधक) न्यायालयात हजर केलं असता, तांत्रिक कारणांमुळे त्यांना जामीन मंजूर झाला, अशी माहिती उपायुक्त प्राशांत स्वामी यांनी दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp