पुण्याची गोष्ट : पुणेकरांसाठी खुशखबर, 165 कोटींचं उभारलं कॅन्सर रुग्णालय

Pune News : पुणेकरांसाठी आता आरोग्याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे महापालिका आणि आपुलकी हेल्थकेअरच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सरग्रस्तांच्या निदानासाठी रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 17 मे 2026 रोजी रविवारी केले.

Pune News

Pune News

मुंबई तक

17 May 2026 (अपडेटेड: 17 May 2026, 08:43 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुणे महापालिकेकडून 14 कोटींची जागा उपलब्ध

point

रुग्णालयासाठी 165 कोटी रुपयांचा खर्च अन् 150 खाटांची सुविधा

पुण्याची गोष्ट : पुणेकरांसाठी आता आरोग्याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे महापालिका आणि आपुलकी हेल्थकेअरच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सरग्रस्तांच्या निदानासाठी रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 17 मे 2026 रोजी रविवारी केले. या रुग्णालयात केवळ पुणेकरांना केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या दरातच उपचार करता येणार असल्याची घोषणा केली आहे. हे रुग्णालय बाणेर परिसरात महापालिकेच्या एक एकर जागेवर उभारण्यात आले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बापाच्या रिसॉर्टवर बोलावून 17 वर्षीय मुलीवर नको तेच, धनिकपुत्राचं मोठं कांड

अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली. या रोगाचे वेळेत निदान आणि योग्य तो उपचार मिळाल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, असा देवेंद्र फडणवील यांनी विश्वास व्यक्त केला. वेळेवर उपचार न घेतल्याने किंवा अनेकदा निदानासाठी विलंब झाल्याने रुग्णांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशातच सरकारकडून विविध आरोग्य योजनांमध्ये कर्करोग उपचारांचा अधिकची सुविधा असल्याची माहिती त्यांनी दिली. 

पुणे महापालिकेकडून 14 कोटींची जागा उपलब्ध

या रुग्णालयासाठी पुणे महापालिकेनं 14 कोटींची जागा उपलब्ध करून दिली. उर्वरित गुंतवणूक व्यवस्थापन आणि कर्मचारी खर्चाची जबाबदारी ही आपुलकी मेडिकल केअर सेंटरकडे सोपवण्यात आली. तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात कर्करोग ग्रीड उभारण्याचे काम केले आहे. याच माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णांना अधिक सक्षम राहण्याचा, समन्वियत आणि जलद आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असे त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. 

हे ही वाचा : लहानग्यांच्या अश्लील व्हिडिओची 300 रुपयांना विक्री, CID कडून मोठा पर्दाफाश

रुग्णालयासाठी 165 कोटी रुपयांचा खर्च अन् 150 खाटांची सुविधा

दरम्यान, या रुग्णालयाला 165 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून यासाठी 150 खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अत्याधुनिक उपकरणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक रुग्णांच्या उपचारासाठी कार्यरत असणार आहेत.