लहानग्यांच्या अश्लील व्हिडिओची 300 रुपयांना विक्री, CID कडून मोठा पर्दाफाश

मुंबई तक

crime news : बाल लैंगिक शोषण आणि चाइल्ड सेक्सुअल एक्सप्लॉइटेटिव्ह अँड अब्यूज मटेरियल आंतरराष्ट्रीय ऑनलाइन व्यापारात गुंतलेल्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. सीआयडीच्या पथकाने या अमानवीय व्यापारात सामील असलेल्या दोन कुख्यात गुन्हेगारांना अटक केली.

ADVERTISEMENT

crime news
crime news
google news

बातम्या हायलाइट

point

ऑनलाइन स्वरुपात बाल लैंगिक शोषण रॅकेट

point

मुलांचे अश्लील व्हिडिओ टेलिग्रामवर अपलोड केल्या जातात 

Crime news : बाल लैंगिक शोषण आणि चाइल्ड सेक्सुअल एक्सप्लॉइटेटिव्ह अँड अब्यूज मटेरियल आंतरराष्ट्रीय ऑनलाइन व्यापारात गुंतलेल्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. सीआयडीच्या पथकाने या अमानवीय व्यापारात सामील असलेल्या दोन कुख्यात गुन्हेगारांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींची ओळख वहाब अन्सारी आणि हसन रजा अशी आहे. ते मूळचे झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. 

हे ही वाचा : तोंडातून रक्त अन् शरीरावर जखमा, परिक्षेसाठी गेलेल्या विद्यार्थीनीसोबत..

ऑनलाइन स्वरुपात बाल लैंगिक शोषण रॅकेट

सीआयडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी एक ऑनलाइन स्वरुपात बाल लैंगिक शोषण रॅकेट चालवत होते. टोळीचे सदस्य देशभरातली विविध राज्यांमधून बाल लैंगिक शोषणाचे काही साहित्य मिळवतात. संबंधित व्हिडिओ हे टेलिग्राम आणि टेलिग्राफद्वारे ओमान, बांग्लादेश आणि युएईसारख्या देशांत ऑनलाइन विकले जात आहेत. परदेशी नागरिकांकडून केवळ 300 रुपये इतके शुल्क आकारून ते मुलांचे भविष्य आणि प्रतिष्ठा धोक्यात घालत आहेत. 

मुलांचे अश्लील व्हिडिओ टेलिग्रामवर अपलोड केल्या जातात 

या तपासातून आरोपींच्या अत्यंत अत्याधुनिक कार्यपद्धती उघडकीस आल्या. ते सर्वप्रथम मुलांचे अश्लील व्हिडिओ बनवून घेताच. नंतर तेच व्हिडिओज् किंवा क्लिप्स टेलिग्राम अॅपद्वारे अपलोड केल्या जातात. या क्लिप्स पहिल्यानंचर परदेशातील ग्राहक व्हिडिओची मागणी करत आहेत, आरोपी पैशांची मागणी करत आहेत. ऑनलाइन पैसे मिळाल्यानंतर आरोपी पैसे देणाऱ्याला टेलिग्राम आणि टेलिग्राम चॅनेलद्वारे संपूर्ण व्हिडिओची देखील लिंक पाठवत आहेत. 

या प्रकरणी झारखंड सीआयडीच्या सायबर क्राइम पोलीस पथकाने गिरडिह जिल्ह्यातील कोल्डीह परिसरातून दोन्ही आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून मोबाईल फोनसह अनेक डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली होती. या उपकरणांची तपासणी केल्यानंतर, सीआयडीला मोठ्या प्रकरणात बाल लैंगिक शोषणाचे साहित्य सापडले. तसेच साआयडीला आरोपींची संशयास्पद बँक खाती आढळून आली होती. अवैध व्यवसायाशी संबंधित पैशांचे व्यवहार व्हायचे.  

हे वाचलं का?