तरुणाची नोकरी गमावली, पुण्यातल्या एफसी रोड परिसरात स्वत:चा गळा चिरला अन्...

Pune News : पुण्यातील एफसी रोड परिसरात शनिवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. नोकरी गमावलेल्या तरुणाने तणावातून स्वत:चा गळा चिरून संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

pune news

pune news

मुंबई तक

30 Mar 2026 (अपडेटेड: 30 Mar 2026, 03:15 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नोकरी गमावल्याने तरुण मानसिक तणावात 

point

प्रकृतीबाबत डॉक्टर काय म्हणाले? 

Pune News : पुण्यातील एफसी रोड परिसरात शनिवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. नोकरी गमावलेल्या तरुणाने तणावातून स्वत:चा गळा चिरून संपवण्याचा प्रयत्न केला. संबंधित प्रकरणातील तरुणाचे नाव आदित्य सातपुते (वय 41) असे आहे. संबंधित तरुण हा मूळचा मुंबईतील बोरिवली परिसरातील रहिवासी आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : चंद्र ग्रहाचा कुंभ राशीत प्रवेश, 'या' लोकांनी करिअर आणि आर्थिक निर्णयात सावधगिरी बाळगावी

नोकरी गमावल्याने तरुण मानसिक तणावात 

सध्या पुण्यातील शिवाजीनगर भोसले नगर परिसरात राहत होता. नोकरी गमावल्यामुळे तो काही दिवसांपासून मानसिक तणाव निर्माण झाला होता. घटनेवेळी सातपुते गंभीर अवस्थेत असून रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. दरम्यान, त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली. 

हे ही वाचा : दहावी पास भामट्याने 12 सुशिक्षित महिलांचं केलं लैंगिक शोषण! डॉक्टर, शास्त्रज्ञ अन् अधिकारी असल्याचं सांगायचा

प्रकृतीबाबत डॉक्टर काय म्हणाले? 

या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उपस्थित नागरिकांनी तत्काळपणे पोलिसांना माहिती देण्यात आली होती. पोलीस आणि नागरिकांनी तत्परता दाखवत जखमी अवस्थेत सातपुते यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितलं.