पुण्याची गोष्ट : पुण्यातून बाहेर पडण्यासाठी 3 महत्त्वाच्या महामार्गांवरील टोलचा दर वाढला, नवे दर आले समोर

मुंबई तक

01 Apr 2026 (अपडेटेड: 01 Apr 2026, 06:49 PM)

Pune News : 1 एप्रिल 2026 पासून टोल महागला जाणार आहे, जाणून घ्या एकूण माहिती.

Pune News

Pune News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

टोलच्या दराचा खिशावर भार 

point

जाणून घ्या प्रवासाचा दर 

point

कॅशलेस पद्धत अनिवार्य

पुण्याची गोष्ट : पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर किंवा पुणे नाशिक महामार्गावरून प्रवास करत असाल तर ही बातमी महत्त्वाची आहे. आज 1 एप्रिल 2026 पासून टोल महागला जाणार आहे. पुण्यातून बाहेर जाणाऱ्या या तीन महमार्गावरील टोलवरील दरवाढीचा परिणाम दिसून येणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल दरात सरासरी ५ टक्क्यांची वाढ केली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : महिलेनं स्वत:च्याच अंघोळीचे अश्लील व्हिडिओ बनवले, नंतर व्हायरल करत... मोठं कांड केलं

टोलच्या दराचा खिशावर भार 

यासोबतच टोलनाक्यांवर रोख व्यवहार पूर्णपणे बंद करून कॅशलेस व्यवहाराकडे अधिकचा भर दिला. पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर ही दरवाढ लागू करण्यात आली. हलक्या वाहनांच्या टोलमध्ये वाढ करण्यात आली. ज्यात, कार, जीप आणि हलक्या वाहनांपासून ते अवजड ट्रकपर्यंत  सर्वांसाठी टोल दरात वाढ करण्यात आली आहे. कार, जीप तसेच इतर वाहनांसाठी एकेरी प्रवासासाठी 95 रुपये तर परतीच्या प्रवासासाठी 130 रुपये मोजावे लागणार आहेत. 

जाणून घ्या प्रवासाचा दर 

हलक्या व्यवसायिक वाहनांसाठी 150 रुपये एकेरी प्रवासाचा दर आहे. तर परतीच्या प्रवासासाठी 210 रुपये दर झाला आहे. बस आणि ट्रकसाठी 315 रुपये मोजावे लागू शकतील, तर मोठ्या अवजड वाहनांसाठी हा आकडा 545 ते 815 रुपयांच्या घरात गेला. 

हे ही वाचा : विम्याच्या पैशांसाठी भावानेच भावावर दगडाने हल्ला करत संपवलं, नंतर दुचाकीवरून दिलं फेकून पुढे...

कॅशलेस पद्धत अनिवार्य

दरम्यान, या निर्णयालाच धरून टोल नाक्यावर व्यवहार हा अधिक पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी कॅशलेस पद्धत अनिवार्य करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी दंडाची तरदूत करण्यात आली. फास्टॅग वैध नसेल तर वाहनचालकाला आहे त्या टोलच्या रक्कमेहून दंड म्हणून दुप्पट किंमत चुकती करावी लागेल. त्यामुळे फास्टॅगमध्ये पुरेसा बॅलेन्स आहे का याचा तपास करावा.