Pune News : पुणे - अहिल्यानगर रस्त्यावरील प्रवास सुसह्य व्हावा अशी पुणेकरांची देखील अपेक्षा आहे. हेच लक्षात घेत राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय जारी केला आहे. राज्य सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने पुणे ते शिरुर दरम्यान 54 किमी लांबीच्या भव्य उड्डाणपुलाचा मार्ग अखेर मोकळा झाला. येरवडा ते शिक्रापुर या पट्ट्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याच प्रकल्पासाठी तब्बल 6 हजार 840 कोटी रुपयांइतका खर्च अपेक्षित धरण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : फुगा फुगवताना फुटला अन् श्वास नलिकेत अडकून बसला, 13 वर्षीय मुलीचा अंत
पुणे-नगर रस्त्यावरील प्रवास आता सुसाट
कामासाठी काढण्यात आलेल्या निविदा इस्टिमेपेक्षा 64 टक्के अधिक दराने डीबीएफओटी या तत्त्वावर प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित आदेश जारी केला आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाला या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नवीन धोरणानुसार, काम पूर्ण करणाऱ्या कंपनीला आगामी तीस वर्षांपर्यंत टोल आकारण्याची मुभा असेल, अशी माहिती आहे, अशातच एकूण मिळणारा उत्पन्नातील वाटा हा महामंडळाला प्राप्त होणार असल्याचं बोललं जातंय.
आगामी चार वर्षांत पूर्ण होणार काम
पुणे - अहिल्यानगर ग्रीन कॉरिडर आणि पुणे-शिरुर उड्डाणपूल या दोन्ही प्रकल्पांमुळे अवजड वाहनांची वाहतूक ही वरील बाजूने वळवण्यात येईल अशी माहिती आहे. जेणेकरून खराडी आणि वाघोली परिसरात स्थानिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही. हे संपूर्ण काम आगामी चार वर्षांमध्ये पूर्ण केले जावं, असं बंधनच कंपनीवर घालण्यात आले आहे.
हे ही वाचा : मुंबईत तरुणीला दिदी अशी हाक मारली, नंतर तिला भररस्त्यातच तरुणाने पॉर्न व्हिडिओ दाखवले, लाज आणणारा प्रकार
या प्रकल्पासाठी आवश्यक निधी मिळवण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी चर्चा झाल्याची माहिती समोर आली. अशातच येरवडा ते खराडी यादरम्यान, उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटेरच्या उभारणीने वाहनचालकांची होणाऱ्या त्रासातून आता लवकरच मुक्तता होणार आहे.
ADVERTISEMENT











