Raj Thackeray : 'राज ठाकरेंच्या छातीवर चढेन', असा एखाद्या चित्रपटाप्रमाणे डायलॉग बोलणाऱ्या सुरक्षा रक्षकाने थेट राज ठाकरेंनाच आपल्या अंगावर घेण्याची भाषा केली. मी या हिंदुस्तानात कोणालाही घाबरत नसल्याचं वक्तव्य केलं. संबंधित व्हिडिओत पुन्हा एकदा परप्रांतीय व्यक्तीची मुजोरी दिसून आली. या एकूण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना पुण्यातील आळंदीस्थित असलेल्या ब्लिंकिट कंपनीतील आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.
ADVERTISEMENT
नेमकं काय म्हणाला सेक्युरीटी गार्ड?
व्हायरल झालेल्या व्हिडिओत संबंधित सेक्युरीटी गार्डची मुजोरी दिसून येत आहे. माझं नाव गोलू आहे, जा ज्याला हे दाखवायचं आहे ते हिंदुस्तानात दाखव. मी कोणत्याही राज ठाकरेला घाबरत नाही, असं वक्तव्य एका गोलू नावाच्या सेक्युरीटी गार्डने केले असून त्याची मुजोरीही दिसून येत आहे. राज ठाकरेंबद्दल अनेक परप्रांतीयांनी अपशब्द वापरल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मराठी-अमराठी वादात गोलूचं वादग्रस्त वक्तव्य
अशातच आता मराठी-अमराठी वादात गोलूने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने ठिणगी पडली आहे. संबंधित व्हिडिओ हा व्हायरल होत आहे. याच प्रकरणात आळंदीचे मनसे अध्यक्ष अजय तापकीर यांनी सेक्युरीटी गार्ड गोलूला जाब विचारला. तसेच ते म्हणाले की, गोलू हा मराठी मजुरांना त्रास देऊ लागला होता. त्यानंतर तो एथवर न थांबता त्याने राज ठाकरेंवर वादग्रस्त वक्तव्य केले.
'मला त्यांच्याबाबतीत फारशी माहिती नव्हती'
याचपार्श्वभूमीवर मनसे आळंदीचे अध्यक्ष अजय तापकीर यांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण समजून घेतलं. त्यानंतर गोलू माफी मागत म्हणाला की, मी माफी मागतो, मी राज ठाकरेंविरोधात वक्तव्य केले. मला त्यांच्याबाबतीत फारशी माहिती नव्हती. मला माहिती नव्हते की ते महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. मी पुन्हा असं वक्तव्य करणार नाही. मी जे वक्तव्य केलंय त्याबाबत मी माफी मागते.
ADVERTISEMENT











